नंदूरबार l प्रतिनिधी
हेपिटायटीस (Hepatitis) या आजाराविषयी जनजागृती करण्यासाठी दरवर्षी वर्ल्ड हेपिटायटीस डे म्हणून साजरा केला जातो. जिल्हा रुग्णालय आणि जिल्हा कारागृह नंदुरबार येथे जागतीक हेपिटायटीस दिवस साजरा करण्यात आला.
यात हेपिटायटीस आजाराची लक्षणे उपचार व उपचाराअभावी व अनेकजणांचा जीव हेपिटाईटीसमुळे जातो. साधारणपणे जगात असंख्य लोकांचा बळी हेपिटायटीसमुळे जातो. दरवर्षी 28 जुलै 2022 रोजी हेपिटायटीस डे म्हणून पाळला जातो. लोकामध्ये जनजागृती निर्माण व्हावी म्हणून हेपिटायटीस नंदुरबार जिल्हा कारागृह येथे 60 कैदीची यांची एच. आय.वी, गुप्तरोग,HBV आणि HCV कावीळ तपासणी करण्यात आली .तसेच या आजाराविषयी जनजागृती करण्यासाठी जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. चारुदत्त शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला.
यावेळी अती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. के डी सातपुते, श्री. मनोज चौधरी व जिल्हा एड्स विभागाचे प्रमुख श्री. नितीन मंडलीक , ज़िल्हा रुग्णलय येथिल अधिसेवीका श्रीमती मोरे,नर्सिंग महाविद्यालय चे प्राचार्य जितेंद्र चव्हाण व सर्व शिक्षक वृंद ,श्रीमती देवरे सार्वजनिक आरोग्य परिचारिका ,अस्मिता मोहिते ,तेजल माळी गणेश कासार ,साजिद अन्सारी आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच सर्वांनी Hepatitis B करिता लसीकरण व तपासणी आवर्जून करून घेण्याचे आव्हान करण्यात आले.नर्सिंग कोलेज़ येथिल विद्यार्थिनी यानी सहभाग नोंदवीला.