नंदुरबार l प्रतिनिधी
काँग्रेस रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या महाराष्ट्र सरचिटणीसपदी श्रीमती टी.आर.खान तर नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटी रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी दत्तू बुलाखी पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अंतर्गत रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या महाराष्ट्र सरचिटणीसपदी श्रीमती टी.आर.खान आणि नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटी रोजगार स्वयंरोजगार विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी दत्तू बुलाखी पवार,
जिल्हा कार्याध्यक्षपदी स्मिता देवीराज वळवी, नंदुरबार शहर कार्याध्यक्षपदी प्रमिला सूर्यवंशी, नंदुरबार तालुकाध्यक्षपदी भास्कर सिताराम सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मुंबईतील दादर येथील काँग्रेस कार्यालय टिळक भवनात आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र काँग्रेस कमिटी रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे प्रदेशाध्यक्ष योगेश मसलगे पाटील यांनी नवनियुक्त पदाधिकार्यांना नियुक्तीपत्र दिले.
नंदुरबार काँग्रेस कमिटी रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे शहराध्यक्ष रऊफ शहा, प्रविण लोहार, सलाम भाया, देविराज वळवी आदी उपस्थित होते.