नंदुरबार l प्रतिनिधी
नवापूर शहरातील मंगलदास पार्क येथे घरात प्रवेश करुन चोरी करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नवापूर येथील दिपचंद प्रेमलाल जयस्वाल यांचे मंगलदास पार्क येथे घर आहे. सदर घराची खिडकी उघडून सिद्धार्थ राजू मराठे व गौतम कुंभार दोघे रा.भगतवाडी, नवापूर व त्यांच्या सोबत असलेल्या अज्ञात इसमाने घरात प्रवेश केला.
यावेळी चोरी करण्याचा प्रयत्न करीत असतांना तिघेजण आढळून आले. याबाबत दिपचंद जयस्वाल यांच्या फिर्यादीवरुन नवापूर पोलिस ठाण्यात तिघांविरोधात भादंवि कलम ४५४, ३८०, ५११ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.दादाभाई वाघ करीत आहेत.








