नंदुरबार l प्रतिनिधी
धडगाव व अक्कलकुवा येथे प्रत्येकी व नवापूर शहरात दोन अशा चौघा मद्यपी चालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, धडगाव तालुक्यातील लक्ष्मीनगर येथील अजय जिऱ्या पावरा हा त्याच्या ताब्यातील दुचाकी (क्र.एम.एच.३९ एए ३५८४) धडगाव-मोलगी रस्त्यावर दारु पिऊन दुचाकी चालवितांना आढळून आला.
तळोदा तालुक्यातील रामपूर येथील अरमानसिंग नारायण नाईक हा त्याच्या ताब्यातील दुचाकी (क्र.एम.एच.३९ ई ५७२४) अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्गावील मोलगी चौफुलीजवळ दारु पिऊन दुचाकी चालवितांना आढळून आला.
नवापूर तालुक्यातील चितवी येथील राहूल दिनेश गावित व बारडोली (सुरत) येथील हिरेनकुमार रमेशभाई सोलंकी हे दोघे जण दारु पिऊन चालवितांना आढळून आले. याबाबत संबंधित पोलिस ठाण्यात चौघांविरोधात मोटार वाहन कायदा कलम १८५ प्रमाणे चार वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.