Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शालेय पोषण आहार योजनेचे सुलभीकरण करण्याची मागणीः अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे शिक्षण संचालकांना निवेदन

team by team
July 28, 2022
in राज्य
0
शालेय पोषण आहार योजनेचे सुलभीकरण करण्याची मागणीः अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे शिक्षण संचालकांना निवेदन

नंदूरबार l प्रतिनिधी

शालेय पोषण आहार योजने अंतर्गत राज्यातील सर्व शाळांचे सन २०१५-१६ ते सन २०१९-२० या पाच वर्षाच्या कालावधीतील शालेय पोषण आहार योजनेच्या अभिलेख्याचे लेखापरीक्षण शिंदे चव्हाण गांधी अँड कंपनी या खाजगी संस्थेमार्फत करण्याचा घाट घातला जात आहे.याला अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने विरोध केला असून तसे निवेदन शिक्षण संचालक यांना अध्यक्ष देविदास बस्वदे व सरचिटणीस कल्याण लवांडे यांच्या संयुक्त स्वाक्षरीने दिले आहे.

 

शालेय पोषण आहार योजनेसंदर्भात शाळांकडून विहित नमुन्यात २२ पानी माहिती मागविण्यात आलेली आहे.तसेच सदर माहिती सोबत सर्व पोषण आहार अभिलेख्याच्या छायांकित प्रतीही मागविण्या बाबत निर्देश दिलेले आहे.ज्या शाळा लेखापरीक्षण करणार नाही त्यांना २५००० रु दंड करणार असल्याचे पत्रात म्हटले आहे.

 

वास्तविक दरवर्षी शालेय पोषण आहार योजनेचे स्थानिक निधी लेखापरीक्षण समिती कडून.लेखापरीक्षण शासनामार्फत केले जाते. त्यासंबंधी उपयोगिता प्रमाण पत्र शाळांकडून घेण्यात येते. तसेच वेळोवेळी तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय पर्यवेक्षण यंत्रणेमार्फत वेळोवेळी अभिलेख्याची व अंमलबजावणी बाबत तपासणी केली जाते.असे असतांना हे खाजगी लेखापरीक्षणाचा अट्टाहास का? असा प्रश्न शिक्षकांना पडला आहे.

 

कोरोना परीस्थिती नंतर नुकत्याच शाळा सुरु झाल्या असतांना विद्यार्थीना शिक्षणाच्या प्रवाहात आणतांना गुणवत्ता पुर्ण शिक्षण मिळणे आवश्यक आहे .त्यासाठी शिक्षकांचा अधिकाधिक वेळ हा अध्यापन कार्यासाठी खर्च होणे अपेक्षित आहे.राज्यातील अनेक शाळा द्विशिक्षकी आहेत.तेथील शिक्षकांना दैनंदिन अध्यापनाबरोबर सर्व प्रशासकीय कामे करावी लागतात,ही वस्तुस्थिती आहे.गेले वर्षभरापासून पोषण आहारासंबधी कोणतेही अनुदान शाळांना देण्यात आले नाही.८० टक्के शाळांचे शाळा अनुदान आँनलाइन प्रक्रीयेत जमा झाले नाही. हा सर्व खर्च भागवावा कसा असा प्रश्न मुख्याध्यापकांना पडला आहे.

 

शालेयपोषण योजनेअंतर्गत लेखापरीक्षणासाठी आवश्यक माहिती उपलब्ध करणे व पाच वर्षाचे सर्व अभिलेखे लेखापरीक्षणासाठी उपलब्ध करणे हे अतिशय क्लिष्ट व वेळखाऊ काम असल्याने शिक्षकांनी याबाबत संघटनेकडे तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

 

व या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी राज्य सल्लागार सुरेश भावसार , राज्य उपाध्यक्ष भगवान पाटील , जिल्हाध्यक्ष मोहन बिसनारीया, सरचिटणीस अशोक देसले , कार्याध्यक्ष ओजू पाडवी कोषाध्यक्ष किशोर चौधरी , सहकोषाध्यक्ष फुलसिंग वसावे, उपाध्यक्ष महेंद्र बैसाणे , संजय खैरणार, संजय देवरे, रत्नकांत भोईटे, लक्ष्मण परदेशी, शंकर वसावे., जितेंद्र वळवी , दारासिंग वळवी,भरत ठाकरे, अमृत पाटील,अतिराम पवार, उपसरचिटणीस , अजयकुमार शिंपी,

उमेश कोळपकर, लोटन जगदाळे,जुगणू व सावे, संयूक्तसचिव, जयश्री जोशी,, रामकृष्ण सोनवणे, अनिल बाविस्कर, भरत पावरा, कैलास लोहार,सदाशिव निकम, महीला आघाडी प्रमूख भावना मिश्रा, तालूका अध्यक्ष /सरचिटणीस,,महेंद्र चौधरी, रविंद्र बैसाणे (शहादा), राजेंद्र चौरे, विशाल पाटील ( नंदूरबार ),नितिन शिंपी, योगेश देसले (तळोदा ) कोमलसिंग पाडवी, केशव पावरा ( धडगांव ), भरत तडवी, आरिफ पिंजारी (अ. कुवा ), मोना वसावे, सोनू ठाकरे (नवापूर )., शांताराम चव्हाण, बालाजी केंद्रे, गणेश लवांडे , संजय मोरे, जयवंत जोशी , जयवंत सोनवणे , आधार मोरे यांनी केली आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

गोपाळपूर शिवारात बिबट्यासह दोन बछडयांचा मुक्तसंचार

Next Post

शिवीगाळ करीत जिवेठार मारण्याची धमकी, सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post
म्हसावद पोलिसांनी जप्त केली १० लाखाची अवैध दारू, दोघांना अटक

शिवीगाळ करीत जिवेठार मारण्याची धमकी, सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add