नंदुरबार l प्रतिनिधी
नवापूर तालुक्यातील खांडबारा रेल्वे स्टेशन पासून काही अंतरावर रेल्वे रुळ ओलांडताना रेल्वेची धडक बसल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नवापूर तालुक्यातील खांडबारा रेल्वे स्टेशनपासून काही अंतरावर प्रल्हाद अर्जुन गोसावी (वय.50) रा. खांडबारा बडीँपाडा, ता.नवापूर हा व्यक्ती रेल्वे रुळ ओलांडत असताना अचानक समोर हुन माल वाहतुक रेल्वे गाडी भरघाव वेगात आल्याने त्यांना जबर धडक दिली.
यात गोसावी यांचा जागीच मृत्यू झाला ,प्रल्हाद गोसावी हे अत्यंत गरीब कुटुंबाचे असुन गावोगावी कटलरी वस्तू विक्री करून उदरनिर्वाह करतात . घटनास्थळी नंदुरबार रेल्वे पोलीस दाखल झालीझाले असून असुन पंचनामा उशिरा पर्यंत सुरू सुरू होता.