नंदुरबार l प्रतिनिधी
येथील श्री. क्षत्रिय अहिर शिंपी समाज हितवर्धक मंडळातर्फे सालाबाद प्रमाणे यावर्षी ही श्री. संत शिरोमणी नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे सजीवन समाधी सोहळा अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात येत होता परंतु यावर्षी शासनातर्फे मोकळीक असल्याने संत नामदेव महाराज सजीवन समाधी सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी माजी नगरसेविका सौ. अनिता शिरीष चौधरी यांच्या हस्ते नामदेव महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच नगरसेवक चारुदत्त कळवणकर यांनी पालखीचे पूजन केले. यावेळी व्यासपिठावर अखील भारतीय क्षत्रिय अहिर शिंपी समाज मध्यवर्ती संस्था चे उपाध्यक्ष सुभाष सावळे, शिंपी समाजाचे जिल्हा अध्यक्ष सोमनाथ शिंपी ,उपाध्यक्ष शैलेश शिंपी ,
सौ. सरिता भामरे , सौ. रंजनाताई शिंपी हे उपस्थित होते. ह्या प्रसंगी भूमिका दिपक जाधव ह्या बालीकीने नामदेव महाराजाचे जिवन चरित्रावर माहिती दिली तर दूर्वा प्रसंन शिंपी यां बालिकेने नामदेव महाराजांची वेशभूषा सादर केली होती.
श्री संत शिरोमणी नामदेव महाराज याच्या प्रतिमेची पालखी मिरवणूक शहरातून काढण्यात आली. ही मिरवणूक तैलिक मंगल कार्यालय पासून सुरुवात करण्यात आली. घी बाजारातील विठ्ठल मंदिरात भक्तीमय वातावरणात नामदेव महाराजांची अभंग , भजन म्हणत मिरवणूक विठ्ठल मंदिरात नेण्यात आली तेथे अध्यक्षांच्या हस्ते आरती करून परत तेलीवाडी मिरवणूक आणण्यात आली यावेळी समाजातील बंधू , भगिनी , युवक , बाल गोपाळ यांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
हा कार्यक्रम संपन्न करण्यासाठी शिंपी समाजातील प्रदीप शिंपी , गजेंद्र शिंपी , मोहन भामरे , विवेकानंद चव्हाण , प्रशांत बिरारी . योगेश खैरनार , दिनेश पवार , अनिल जाधव , विजय देवरे , वैभव करवंदकर ,युवक अध्यक्ष अजय देवरे , मुकेश सोनवणे , प्रसाद कापुरे, भावेश बागुल ,अमित कापडणे ,शेखर जगताप,प्रसन्न शिंपी यांच्या सह असंख्य युवक उपस्थित होते.