नंदूरबार l प्रतिनिधी
शहादा-खेतिया रस्त्यावरील सुसरी धरण वळण रस्त्याचे अपूर्ण अवस्थेत असलेल्या कामामुळे अनेकदा अपघात होऊन वाहनधारक जायबंदी होत होते. यामुळे रस्ता दुरुस्ती साठी गेल्या चार महिन्यापूर्वी आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी संबंधित विभागाकडून तात्पुरता थातुर मातुर मलम पट्टी करण्यात आली होती.परंतु रस्त्याची आजपर्यंत अक्षरशः चाळण झाल्याने भाजप व काँग्रेसतर्फे रविवारी सुसरी धरण जवळील रस्त्यावर रस्ता दुरुस्तीसाठी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
दरम्यान आंदोलकांना संबंधित विभागाकडून येत्या आठ दिवसात रस्ता दुरुस्ती करण्यात येईल असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलनाला सर्व पक्षाकडून आठ दिवसासाठी स्थगिती देण्यात आली.
कोळदा खेतिया रस्त्यावरील सुसरी धरण वळण रस्त्याचे काम गेल्या अनेक महिन्यापासून अपूर्णवस्थेत असल्याने जागोजागी मोठमोठे खड्डे पडल्याने अपघाताचे प्रमाण वाढले होते.यामुळे रविवारी भाजप तसेच काँग्रेस मार्फत रस्ता दुरुस्ती होई पर्यंत रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते.
यावेळी जेष्ठ नेते डॉ. कांतीलाल टाटीया, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील,तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, किसान मोर्चाचे प्रदेश सदस्य डॉ. किशोर पाटील, काँग्रेस तालुकाध्यक्ष सुरेश नाईक, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस किशोर पाटील, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष निलेश निकम, पं स.सदस्य सत्येन वळवी, सुलतानपूर उपसरपंच हर्षल पाटील, काशिनाथ सोनार,
डॉ. अजित पाटील, निंबा पाटील, नवलपूर चे सरपंच प्रकाश पवार, गोपाल पावरा, हिम्मत गिरास ,विलास पाटील, गोकुळ पाटील, निंबा मराठे, कैलास पाटील, संजय पाटील, प्रभाकर पाटील सह ब्राह्मणपुरी, सुलतानपूर, सूलवाडे, बहिरपुर आदि गावातील नागरिक वाहनधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी रस्ता रोको आंदोलनस्थळी म्हसावद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार, शहाद्याचे पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पाटील ,घनश्याम सूर्यवंशी, यांच्यासह कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.








