नंदूरबार l प्रतिनिधी
काकेश्वर विद्या प्रसारक संस्था संचलित श्रीमती क.पु. पाटील माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय भालेर ता.नंदूरबार येथे ७५ व्या भारतीय स्वातंत्र्याच्या आजादी का अमृत महोत्सवाअंतर्गत व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गावातून वृक्ष दिंडी काढून विद्यालयात वृक्षारोपण करण्यात .आले
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी , देवमोगरा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र गावित यांनी विद्यालयाच्या आवारात वृक्षारोपण केले. व महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रोपदी मुर्म यांचे अभिनंदन व शुभेच्छा पर भाषण विजय चौधरी यांनी केले.

यावेळी वनक्षेत्रपाल ए. आर. माळके व त्यांचे कर्मचारी वृंद ,याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष भास्करराव हिरामण पाटील, गटविकास अधिकारी , भिका पाटील उपाध्यक्ष चंद्रशेखर पाटील, विठोबा माळी, राकेश माळी, सोपान चव्हाण, भगवान माळी ,बी.के.पाटील ,रमेश पाटील निंभेल येथील पालक, आरोग्य सेविका चंद्रकला पाटील अंगणवाडी सेविका सूर्यवंशी , बि.डी.पाटील, प्राचार्य सौ.विद्या चव्हाण, पर्यवेक्षक ए.व्ही.कुवर उपस्थित होते.
नंदूरबार तालुका ग्रामीण पोलीस स्टेशन व सामाजिक वनीकरण यांनी शाळेला ३०० वृक्ष रोपांची (बालतरुची) भेट दिली. शाळेने केलेल्या विविध उपक्रमांचे आयोजन- विद्यार्थ्यांनी भक्तिमय वातावरणातून वारकरी दिंडी, भजन, लेझीम नृत्य, घोषवाक्य वाक्य, आदिवासी शिबली नृत्य, मुलींनी अतिशय सुंदर अशी वृक्षावरील गीते गायली विविध गीतांच्या माध्यमातून वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाचा संदेश दिला .
यावेळी भालेर ,नगाव , तिसी गावातील संस्थेचे हितचिंतक व पालक वर्ग खूप संख्येने उपस्थित होते. पालखीचे गावात गल्लीत घरोघरी त्यात ठेवलेल्या तुळशी बालतरुचे पूजन श्रद्धेने महिलांनी केले .कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी यांनी खूप परिश्रम घेतले.व्ही.व्ही. इसी यांनी वृक्षारोपणाचे महत्त्व व वृक्ष संवर्धन काळाची गरज यावर अधिक दिली सूत्रसंचालन केले. पर्यवेक्षक ए.व्ही.कुवर यांनी आभार मानले.








