नंदूरबार l प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील नगरपरिषदेतर्फे रखडलेल्या विविध विकास कामांसाठी तसेच भाजपा नगरसेवकांच्या प्रभागामध्ये 10 कोटीचा निधीची मागणी मा.आ. शिरीष चौधरी यांच्यासह नगरसेवकांनी मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या कडे केली आहे.

राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांची सह्याद्री अतिथि गृह मुंबई येथे मा.आमदार शिरीष चौधरी, नगरसेवक प्रशांत चौधरी, गौरव चौधरी, चंदूभाई पटेल यांनी सदिच्छा भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या.
नंदुरबार नगरपरिषदेच्या शहरातील रखडलेल्या विविध विकास कामांसाठी तसेच भाजपा नगरसेवकांच्या प्रभागामध्ये 10 कोटीचा निधीची मागणी यावेळी मा.आमदार शिरीष चौधरी, नगरसेवक प्रशांत चौधरी, गौरव चौधरी, चंदूभाई पटेल यांनी केली.यावेळी मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.








