Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

रजाळ्यात मेंढ्यांच्या कळपावर लांडग्यांचा हल्ला ; ११ मेंढ्या ठार

team by team
July 26, 2022
in राज्य
0
रजाळ्यात मेंढ्यांच्या कळपावर लांडग्यांचा हल्ला ; ११ मेंढ्या ठार

नंदुरबार । प्रतिनिधी

तालुक्यातील रजाळे येथे शेत शिवारात मध्यरात्री मेंढ्यांच्या कळपावर ४ ते ५ लांडग्यांच्या टोळीने हल्ला करून तब्बल ११ मेंढ्यांचा फडशा पाडला आहे. या हल्ल्यात मेंढपाळाचे सुमारे एक लाखाचे नुकसान झाले आहे. या घटनेचा वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी पाहणी करून पंचनामा केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की , रजाळे येथील डेमा ठेलारी यांच्या मेंढ्यांचा कळपा आपल्या शेतातच असल्याने रात्री १ वाजेच्या सुमारास अचानक चार ते पाच लांडग्यांनी मेंढ्यांवर हल्ला चढवून यात दहा मेंढ्या व एक कोकरू अशी ११ जनावरे फस्त केली आहेत.

यामुळे ठेलारी कुटुंबियांमध्ये रात्रीच्या सुमारास ही घटना घडल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते परिसरात कोणीही नसल्याने कुटुंबियांवर घबराट निर्माण झाली होती सुदैवाने लांडग्याच्या हल्यात ते बचावले आहेत.

तसेच त्यांच्या मेंढ्यांच्या कळपामध्ये १५० ते २०० मेंढ्या होत्या यात ११ मेंढ्या लांडग्यांनी ठार केले आहे. यामुळे डेमा ठेलारी यांचे एक ते दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेचा वन विभागाकडून पंचनामा करण्यात आला आहे. यावेळी वनविभागाचे कर्मचारी तांबोळी व पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. नाना पाटील, सावळीराम करिया, सिदा होडगर , डेमा ठेलारी आदी यावेळी पंचनामा करते वेळी उपस्थित होते. सदर घटनेमुळे परिसरात शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नाशिक-दिल्ली विमानसेवा होणार पूर्ववत; आंतरराष्ट्रीय पातळीवर जोडले जाणार नाशिक

Next Post

नंदूरबार येथील भाजपा नगरसेवकांच्या प्रभागामध्ये 10 कोटीच्या निधीची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add