बोरद l प्रतिनिधी
तळोदा तालुक्यातील अमोणी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थांना गणवेश व शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. या साहित्य वाटपाच्या कार्यक्रच्या अध्यक्षा म्हणून नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष ॲड.सिमा वळवी ह्या उपस्थित होत्या.
त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व गणवेशाचे वाटप करण्यात आले. यावेळी ॲड.सिमा वळवी यांनी उपस्थित विद्यार्थी तसेच गावकऱ्यांना आपल्या शब्दातून अनमोल असं मार्गदर्शन केले. त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या निधीतून शाळेचं बांधकाम करून देण्याचे देखील आश्वासन त्यांनी उपस्थितांना दिले. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांच्या वतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले.
या शालेय साहित्य वाटप प्रसंगी संजय गांधी निराधार समितीच्या माजी सदस्य निशा वळवी , केंद्रप्रमुख जयश्री बागले,मुख्याध्यापक समाधान गाडगे ,शिक्षक राजेश गाडगे , शाळा समिती अध्यक्ष लक्ष्मण नाईक , सदस्य बहादूरसिंग वळवी, सरपंच बाबुसिंग नाईक, अंगणवाडी सेविका उषा नाईक, संदीप पाडवी , नितिन वळवी , यासह परिसरातील व गावातील नगरीक नागरिकांनी उपस्थित होते.