नंदूरबार l प्रतिनिधी
जि.प.समाज कल्याण सभापती रतन पाडवी यांनी धडगाव तालुक्यातील सुरवाणी येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाला भेट दिली असता त्या ठिकाणी शिक्षक, कर्मचारी उपस्थित राहत नाहीत, ते गैरहजर आढळून येतात.
तसेच कोणीही जबाबदार कर्मचारी उपस्थित राहत नाहीत. वस्तीगृहात भेट दिल्यावर १८ विद्यार्थिनी आजारी असल्याचे दिसून आले. त्यानंतर आपण स्वत: जिल्हा आरोग्याधिकारी यांच्याशी संपर्क साधून तात्काळ तालुका आरोग्याधिकारी धडगाव यांच्यामार्फत आरोग्य पथक पाठवून विद्यार्थिनींवर उपचार करण्यात आला.
सदर वस्तीगृहात व विद्यालयात कर्मचारी उपस्थित राहत नसल्याची गंभीर तक्रार रतन पाडवी यांनी जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांच्या कडे केली आहे.तसेच या संदर्भात जिल्हा परिषदेच्या स्थाई सभेत विषय घेत अधिकाऱ्यांचा चांगलेच फैलावर घेतले.
या निवेदनात म्हटले आहे की, धडगांव तालुक्यातील सुरवाणी येथील कस्तुरबा गांधी बालीका विद्यालयाला भेट दिली असता त्याठिकाणी शिक्षक कर्मचारी गैरहजर आढळुन आले . तसेच वस्तीगृहाला भेट दिली असता त्याठिकाणी कोणीही जबाबदार कर्मचारी आढळुन आले नाही .
मुख्य स्वंयपाकी श्रीमती ब्राम्हणे व त्यांच्या सहाय्यक श्रीमती पाडवी व परमार हे उपस्थितीत होते . मुलीच्या वस्तीगृहातील खोल्याची पाहणी केली असता त्याठिकाणी 18 विद्यार्थीनी या आजारी असल्याचे दिसुन आले . त्यानंतर मी स्वतः जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांच्याशी भ्रमणध्वनी व्दारे संपर्क साधुन त्यांनी तात्काळ तालुका आरोग्य अधिकारी धडगांव यांच्यामार्फत आरोग्य पथक पाठवून आजारी विद्यार्थांनीवर उपचार करण्यात आला .
कस्तुरंबा गांधी बालीका विद्यालय व वस्तीगृह हे माझ्या गावात असुन सुध्दा मी आजपावेतो कोणताही कर्मचारी पाहण्यात आलेला नाही . हि बाब गंभीर स्वरुपाची असुन याबाबत कार्यवाही करण्यात यावी . तसेच शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरवाणी येथे भेट दिली असता त्याठिकाणी शासकिय कर्मचारी तसेच विद्यार्थी सुध्दा उपस्थित नव्हते चौकशी केली असता त्याठिकाणी पाहरेकरी हे एवढेच उपस्थित होते .
औद्योगिक प्रशिक्षण संस्था हि पण माझ्या गावात असुन त्याठिकाणी कर्मचारी व शिक्षक नसल्याचे वांरवार दिसुन येते . शासकिय आदिवासी मुलांचे वस्तीगृह सुरवाणी येथे भेट दिली असता त्याठिकाणी सुध्दा हिच परिस्थीती असुन याबाबतही आपण कार्यवाही करावी .
या तिन्ही संस्था माझ्या घरापासुन हाकेच्या अंतरावर आहेत . ब – याच वेळेस फेरफटका मारण्यासाठी त्यांच रस्त्यांने जात येत असतो ब – याच वेळेस मला असे दिसून आले आहे कि कस्तुरंबा बालिका विद्यालय व शासकिय आदिवासी मुलांचे वस्तीगृह जवळ जवळ असल्याने तसेच त्याठिकाणी जबाबदार कर्मचारी नसल्यामुळे काही अनुचित प्रकार घडन्याची संभावना लक्षात घेता आपण आपल्यास्तरावरुन चौकशी करुन योग्य ती कार्यवाही करण्यात मागणी जि.प.समाज कल्याण सभापती रतन पाडवी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.