नंदूरबार l प्रतिनिधी
गोमाई नदीवरील पुलावर , प्रकाशा येथील तापी नदीच्या पुलावर , सुसरी नदीच्या पुलावर पुढे दराफाटा जवळ खराब रस्त्याच्या निषेध करण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याने दि.२४ जुलै रोजी सकाळी ९ .३० वाजेपासुन ते आंदोलन संपेपर्यंत वाहतुक वळविण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
नंदुरबार जिल्हयातुन जाणारा विसरवाडी – नंदुरबार- कोळदा – प्रकाशा- शहादा ते खेतिया ( म.प्र . ) राष्ट्रीय महामार्ग क्रं . ७५२ चा भाग -२ कोळदा ते खेतिया या रस्त्याचे एम . एस . आर.डी.सी. नाशिक यांच्या देखरेखी अंर्तगत रस्ता दुरुस्तीचे काम सुरु असुन त्यातील डामरखेडा ते प्रकाशा रस्ता व गोमाई नदी वरील पुल खराब असुन ठिकठिकाणी मोठ – मोठे खडडे पडलेले असल्याने प्रवाशांना जिव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे .
तरी सदर रस्त्याच्या निषेधार्थ दि .२४ जुलै रोजी सकाळी १० वाजता १ ) गोमाई नदीवरील पुलावर , २ ) प्रकाशा येथील तापी नदीच्या पुलावर , ३ ) सुसरी नदीच्या पुलावर पुढे दराफाटा जवळ येथे हरिभाई पाटील रा . प्रकाशा यांच्या नेतृत्वात स्थानिक व परिसरातील नागरीक , शेतकरी , मजुर तसेच विविध राजकिय व सामाजिक संघटना यांच्यासह रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याने मोठया प्रमाणावर नागरीक व कार्यकर्ते जमण्याची शक्यता आहे .
त्याअनुषंगाने दि . २४ जुलै रोजी सकाळी ९ .३० वाजेपासुन ते आंदोलन संपेपर्यंत खालील प्रमाणे वाहतुक वळविण्यात येत आहे . १ ) नंदुरबार कडुन शहादा कडे येणारी वाहने ही वाकाचार रस्ता – तळोदा – आमलाड बोरद , कलसाडी – पाडळदा बुडीगव्हाण म्हसावद या मार्गाने जातील , २ ) खेतिया कडुन नंदुरबार कडे जाणारी वाहतुक सुलतानपुर फाटा – सुलवाडे- म्हसावद – बुडीगव्हाण- पाडळदा कलसाडी – बोरद – आमलाड़ – तळोदा मार्गे नंदुरबार कडे जातील .
३ ) शिरपुर कडे जाणारी वाहतुक ही नंदुरबार येथुन दोंडाईचा – शिंदखेडा मार्गे शिरपुर कडे जातील . ४ ) अनरदबारी कडुन तळोदा व नंदुरबार कडे जाणारी वाहतुक ही दोंडाईचा नंदुरबार मार्गे तळोदा कडे जातील . सदर आदेशाचा भंग केल्यास मुंबई पोलीस अधिनियम कायदा कलम १३१ प्रमाणे अपराध राहिल असे आदेश पोलिस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी आदेशात नमूद करण्यात आले आहे.