नवापूर l प्रतिनिधी
नवापूरकरांनो सावधान नवापूर शहरात चड्डी बनियन गॅंग सक्रिय झाली आहे.केव्हा आपल्या घरावर डल्ला मारतील याचा नेम नाही आपल्या घराची व आपल्या मालमत्तेची काळजी घ्या. कुत्र्याच्या व नागरिकांच्या सर्तकेतेनं नवापूरातील मोठी घरफोडी टळली आहे. चड्डी बनियान गँगनं चोरीच्या इराद्यानं नवापूर शहरातील घाचीवाड्यात प्रवेश केला. मात्र त्यांचा हा प्रयत्न फसला.
नवापूर शहरातील घाचीवाडी अल शिफा हॉस्पिटल परिसरामध्ये काल मध्यरात्री एक वाजेच्या दरम्यान चड्डी बनियन गॅंग चोरटे चोरी करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.
नवापूर तालुक्यात चोरटे पोलिसांना आव्हान देत आहे.नवापूर शहरातील अल शिफा हॉस्पिटल नजीक असलेल्या सीस टिमोल यांचे वॉल कंपाऊंड च्या दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांचा पाळीव कुत्र्याच्या सतर्कतेने चोरटे पळाले. त्यानंतर हासिम पालावाला यांच्या घरच्या वरच्या मजल्यात चोरट्यांनी प्रवेश केला.त्याठिकाणी त्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला घरातील सदस्यांना जाग आल्याने चोरट्यांनी पळ काढला.
चोरी करणारे चार चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहे. सदर चोरटे घरात शिरत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्याने नवापूर शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.नवापूर पोलीस या चोट्यांचा जेरबंद करून नवापूरकरांची भीती दूर करतील का असा प्रश्न उपस्थित केला. नवापूर पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहे.