नंदूरबार l प्रतिनिधी
शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख डॉ . विक्रांत मोरे यांनी काही दिवसांपूर्वी जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिला होता.भाजपा पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु होती.अखेर आज दि.२३ जुलै रोजी त्यांनी मुंबई येथील कार्यालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थिती भाजपात प्रवेश केला.
शिवसेनेचे नंदुरबार जिल्हाप्रमुख डॉ . विक्रांत मोरे यांनी काही दिवसांपूर्वी जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे . याबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना देण्यात आलेल्या राजीनाम्यात त्यांनी जिल्ह्यात पक्षाचा प्रोटोकॉल पाळला जात नसल्याने व व्यक्ती केंद्रीत राजकारण होत असल्याने राजीनामा दिल्याचे म्हटले होते . प्रथमच नंदुरबार पालिकेवर चार नगरसेवक निवडून आणले आहेत . पालिकेवर शिवसेनेचा प्रथम उपनगराध्यक्षा म्हणून शोभाताई मोरे विराजमान झाल्या होत्या.
एवढेच नव्हे तर विविध सामाजिक उपक्रम राबविले . तसेच आंदोलनेही केली . जिल्ह्यात नेत्यांचे दौरे यशस्वी केले . यामुळे शिवसेनेचा झंझावात पाहून इतर पक्षातील अनेक नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केला . मात्र त्यांच्या या कामाकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत डॉ . मोरे यांनी राजीनाम्यातून व्यक्त केली होती .
डॉ . विक्रांत मोरे यांनी जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिल्याने चर्चेचा विषय ठरत होता . दरम्यान , ते भाजपा पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु होती ते नेमके कोणत्या पक्षात प्रवेश करतात ? याकडे साऱ्यांचे लागून होते.
अखेर आज दि. २३ जुलै रोजी शिवसेनेचे डॉ. विक्रांत दिलीपराव मोरे यांनी मुंबई येथे भारतीय जनता पार्टी कार्यालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील,
नंदुरबार लोकसभा खा. डॉ.हिना गावित, आ.डॉ.विजयकुमार गावित, आ.राजेश पाडवी, माजी आमदार शिरीष चौधरी, जिल्हाध्यक्ष विजय चौधरी आदी उपस्थित होते.यावेळी त्यांच्या समवेत अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केला.