नंदूरबार l प्रतिनिधी
एस.ए.मिनिस्ट्रीज ट्रस्ट संचलित, एस.ए.मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 75 व्या भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत, 23 जुलै वनसंवर्धन दिनाचे औचित्य साधून शाळेत वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
याप्रसंगी उपनगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक उपनिरीक्षक दिनेश भदाणे, शाळेच्या प्राचार्य नूतनवर्षां वळवी, उपमुख्याध्यापक व्ही. आर. पवार, पर्यवेक्षिका वंदना जांबिलसा, पर्यवेक्षक मीनल वळवी, अरुण गर्गे, अविनाश सोनेरी,उर्मिला मोरे, ललिता पानपाटील आदी शिक्षक उपस्थित होते यावेळी श्री. भदाने यांनी शाळेस 300 झाडांची रोपे भेट दिली.bव मान्यवरांच्या हस्ते रोपांची लागवड करण्यात आली. यावेळी शाळेत पर्यावरण संवर्धन उपक्रमाअंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये कार्यक्रमाच्या सुरुवातीस दिनेश भदाने यांचे स्वागत शाळेच्या प्राचार्य नूतनवर्षा वळवी यांनी पुष्पगुच्छ व पिंपळाचे रोप देऊन केले. यावेळी प्रास्ताविक सादर करताना गायत्री पाटील म्हणाल्या की,विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धन वृक्ष संरक्षणाविषयी जागरुकता निर्माण व्हावी हा कार्यक्रमाचा उद्देश होय, यावेळी इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी “दोस्तो तुम्ही बताये पर्यावरण के बारे मे” या गाण्यावर थीम डान्स सादर करून पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला.
तर इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी “वन है तो जीवन हे” या माध्यमातून नाटिका सादर केली इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी “सेव वॉटर सेव लाइफ” या गाण्यावर डान्स सादर केला यावेळी कार्यक्रमाचे आकर्षण बिंदू ठरले ते म्हणजे इयत्ता पाचवीचे विद्यार्थी त्यांनी “येरे येरे पावसा रुसलास का?” या गाण्यावर आकर्षक नृत्य सादर केले. सदर कार्यक्रमा प्रसंगी उपनिरीक्षक दिनेश भदाने यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना वृक्षसंवर्धनाची पर्यावरणा करिता काय गरज आहे. याचे महत्त्व पटवून दिले व प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या घरासमोर किमान एक तरी वृक्षाची लागवड करून पर्यावरणास मदत करावी असा संदेश देत भविष्या करता शुभेच्छा दिल्या.
यावेळी शाळेत पर्यावरणावर आधारित पोस्टर स्पर्धेचे आयोजन तसेच ग्लोबल वार्मिंग या विषयावर वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले, यामध्ये ही विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला, सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौतम सोनवणे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रसाद दीक्षित यांनी केले.