नंदूरबार l प्रतिनिधी
मोगरा ता.अक्कलकुवा परिसरात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याने पशु वेगवेगळ्या साथीच्या आजाराने मृत्यू होत आहे.अनेक दिवसांपासून सुरू असलेला पशु मृत्यू थांबता थांबेना व पशुसंवर्धन विभागाने पशु वैद्यकीय सेवा पुरवणे अति आवश्यक आहे. व होती परंतु पशुसंवर्धन विभागाने कुठल्याही प्रकारची आज पर्यंत सेवा दिली नाही.
अक्कलकुवा तालुक्यातील मोगरा परिसरात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याने पशु वेगवेगळ्या साथीच्या आजाराने मृत्यू होत आहे.याबाबत पशुसंवर्धन विभागाने पशु वैद्यकीय सेवा पुरवली नसल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.
लसीकरण ही केले नाही.व येथिल पशु मालकांना हे ही माहित नाही की या परिसरातला वैद्यकीय अधिकारी कोण आहे. मोगरा गावात मागील अनेक दिवसांपासून पशु मृत्यू झाला आहेत. त्यातील जाहग्या अमद्या राउत यांचा एक बैल,तिज्या बामण्या वसावे यांचा एक बैल,दमण्या रोता वसावे यांचा एक बैल,बाज्या धर्मा पाडवी यांचा एक बैल,दातक्या गिंब्या वसावे यांची एक गाय व भांगा गोवल्या वसावे यांची दोन गायी व एक बैल आणि इंद्या बासरा वसावे यांचा एक बैल असे परिसरातील नागरिकांचे पशु दगावले आहेत.
परंतु प्रशासकीय पातळीवर सदर प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जात आहे.पशु संवर्धन विभागाने या गावातील व परिसरातील नागरिकांच्या जनवारांना योग्य वेळी. उपचार मिळणे गरजेचे आहे.व येशील पशुंना लसीकरण करणे अति आवश्यक आहे. असे महाराष्ट्र राज्य आदिवासी टाईगर सेना संघटनेचे राज्य युवा अध्यक्ष साया वसावे यांनी सांगत पशु मालकांची संवाद साधतांना ही विदारक स्थिती समोर आली.








