नंदुरबार l प्रतिनिधी
शहरातील वाहतुक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी वाहतुक पोलिस कर्मचारी नेहमी कर्तव्यावर हजर असतात. पावसाळ्यात देखील वाहतुक पोलिस कर्मचारी चौकांमध्ये उभे राहुन कर्तव्य बजवितात. हीच जाणीव ओळखुन श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनी नंदुरबार शाखेच्या वतीने वाहतुक पोलिस कर्मचार्यांना रेनकोटचे वाटप करण्यात आले. या रेनकोट वाटपातून वाहतुक पोलिस कर्मचार्यांविषयी सामाजिक बांधिलकी जोपासण्यात आली आहे.
उन्हाळा असो, पावसाळा असो की हिवाळा या तिन्ही ऋतुंमध्ये नियुक्त असलेल्या कर्तव्याच्या ठिकाणी हजर राहुन नंदुरबार शहर वाहतुक पोलिस शाखेचे पोलिस अधिकारी, कर्मचारी नियमितपणे कर्तव्य बजवितात.
वर्दळीच्या रस्त्यांसह चौकांमध्ये वाहतुकीची कोंडी होवु नये आणि बेशिस्त वाहतुकीला शिस्त लागावी, यासाठी वाहतुक शाखेचे पोलिस कर्मचारी वाहतुक व्यवस्था सुरळीतेसाठी काम करतात.
पावसाळ्यात देखील वाहतुक पोलिस कर्मचारी आपल्या कर्तव्याच्या ठिकाणी हजर राहुन वाहतुक व्यवस्थेचे नियोजन करतात. याच कर्तव्याची जाण ठेवुन नंदुरबार येथील श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनी शाखेच्या वतीने नंदुरबार शहर वाहतुक पोलिस कर्मचार्यांना रेनकोट वाटप करण्यात आले आहेत.
शहर वाहतुक शाखेत आयोजित कार्यक्रमातुन वाहतुक पोलिस कर्मचार्यांना रेनकोटचे वितरण झाले. याप्रसंगी दिनेश कोकाने, चंद्रकांत सुलगावकर, राजू खैरनार, योगेश शिंदे, सचिन राजपूत यांच्यासह वाहतुक शाखेचे कर्मचारी उपस्थित होते.








