चिनोदा.ता.तळोदा | वार्ताहर
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्ताने सेवाभावे प्रतिष्ठान तळोदा व महात्मा फुले सामाजिक लोकविकास बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त तळोदा येथील कालिका माता परिसर व साठे गल्लीतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करून साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाला वक्ते म्हणून सामजिक समरसता विभाग कार्यकर्ता किशोर चव्हाण तसेच भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रदीप शेंडे, स्वीकृत नगरसेवक हेमलाल मगरे, भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष शिरीष माळी, सेवाभावे प्रतिष्ठानचे अध्यक्ष उमेश सोनवणे हे उपस्थित होते.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महात्मा फुले सामाजिक लोकविकास बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष अंबालाल साठे यांनी केले. तर प्रस्तावना सेवाभावे प्रतिष्ठानचे अध्यक्ष उमेश सोनवणे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी जीवन अहिरे अनुसूचित जाती मोर्चा तळोदा शहरध्यक्ष, गणेश अहिरे, सेवाभावे प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष संतोष चौधरी, उपाध्यक्ष सागर पाटील, सचिव कविता कलाल, संचालक नकुल ठाकरे, अतुल पाटील, अनिल नाईक आदींनी परिश्रम घेतले.
तर आभार प्रदर्शन जीवन अहिरे यांनी मानले.








