चिनोदा.ता.तळोदा | वार्ताहर
तळोदा येथील बडोदा बँक ही सर्वात जुनी व प्रथम राष्ट्रीयकृत बँक असून बँकेने तत्पर व ग्राहकोपयोगी चांगली सेवा देऊन आपल्या कार्यकुशलतेमुळे ग्राहकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. ग्रामीण भागात असून सुद्धा बँकेच्या तळोदा शाखेने आपल्या कामाच्या जोरावर बॉब वर्ल्ड डिजिटल बँकिंग मध्ये ६०० शाखांमध्ये प्रथम क्रमांक मिळविला आहे. यामुळे आज बडोदा बँक ही तळोद्यातील अग्रणी बँक असल्याचे प्रतिपादन नगराध्यक्ष अजय परदेशी यांनी केले.
बडोदा बँकेच्या ११५ व्या वर्धापन दिनानिमित्त व बॉब वर्ल्ड डिजिटल बँकिंग मध्ये पुना झोन मध्ये प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल संत सावता माळी भवन येथे आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी उपनगराध्यक्षा भाग्यश्री चौधरी, माजी प्राचार्य अरुण मगरे, बँकेचे स्थापने पासून चे जेष्ठ खातेदार नरेंद्रभाई वाणी, भाजप शहर अध्यक्ष योगेश चौधरी हे व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात रक्तदान शिबिरात १९ रक्तदात्यांनी रक्तदान केले. माजी प्राचार्य अरुण मगरे यांनी बँकेने मला नोकरी लागल्यापासून वेळोवेळी सहकार्य करीत कर्ज दिल्याने आजच्या माझ्या प्रगतीत बँकेचा मोलाचा वाटा असल्याचे सांगितले.
तसेच बँकेच्या कार्याची माहिती देतांना शाखाधिकारी विशाल जाधव यांनी सांगितले की, महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी २० जुलै १९०८ रोजी बरोडा बँकेची स्थापना केली व तळोद्यात बँकेची शाखा १०७० साली उघडण्यात आली. त्यास ५१ वर्ष पूर्ण झाली आहेत.
बँकेच्या तळोदा शाखेने आज पर्यंत आपल्या चांगल्या सेवेच्या जोरावर बँकेच्या अनेक चांगल्या योजना राबविल्यात त्यात बँकेला बॉब वर्ल्ड डिजिटल बँकिंग मध्ये पुना झोन मध्ये प्रथम पारितोषिक मिळाले आहे. या सोबतच बँकेने जीवन ज्योती सुरक्षा योजना,
प्रधानमंत्री सुरक्षा योजना या विमा योजनेत जिल्ह्यात सर्वाधिक नागरिकांचा पॉलिसीज काढल्या व यात बँक जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर आहे व कोरोना काळात त्यांचे दावे सुद्धा दिले आहेत. १० वर्षीय सुकन्या समृद्धी योजना व रस्त्यावरील व्यावसायिक यांच्यासाठी प्रधानमंत्री स्वनिधी योजनेत १०० व्यक्तींना कर्ज दिले आहे. तसेच कृषि गोल्ड योजना, वैयक्तिक कर्जे, वाहन कर्ज, कृषि कर्ज, गृह कर्ज यात सर्वाधिक ग्राहक आज बँकेकडे आहेत असे त्यांनी यावेळी सांगितले.
बँकेचा वर्धापन दिनाचे कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाखाधिकारी विशाल जाधव, सहाय्यक शाखाधिकारी अपेक्षा पाटील, लोन ऑफिसर नितीन पाटील, कृषि अधिकारी चित्रा स्वरूप आदींसह बँक कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.








