बोरद l प्रतिनिधी
तळोदा तालुक्यातील बोरद प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत असणाऱ्या अंगणवाडीतील आशा वर्कर व सुपरवायझर यांना ना. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्ताने साड्या
आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते साड्या वाटप करण्यात आल्या.
तळोदा तालुक्यातील बोरद येथे कोरोना काळात चांगले काम करणाऱ्या ३४ आशा वर्कर्स व ४ सुपरवाईझर अशा एकूण ३८ आशा वर्कर्स यांना भाजप आदिवासी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष दरबारसिंग पाडवी यांच्या सौजन्याने
ना. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवस निमित्ताने आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते साड्या वाटप करण्यात आल्या .
यावेळी तळोदा तालुका भाजप अध्यक्ष प्रकाश पाडवी, मतदार संघाचे प्रभारी नारायण ठाकरे,प.स. सदस्य विजय राणा, नगराध्यक्ष अजय परदेशी आदिवासी आघाडी चे जिल्हा उपाध्यक्ष दरबारसिंग पाडवी, तालुका भाजपा अध्यक्ष प्रकाश वळवी, जि. प. सदस्य सुनीता पवार,
माजी सभापती सतीश वळवी , सचिन गोसावी, गोपी पावरा ,विठ्ठल बागले,स्वीय सहाय्यक वीरसिंग पाडवी, प्रवीण भिलाव मंगेश पाटील, विनोद शेवाळे, साजन शेवाळे ,गौतम भिलाव आदी सह आरोग्य कर्मचारी अंगणवाडी सेविका ,मदतनीस,आशा वर्कर्स, उपस्थित होते.








