नंदुरबार l प्रतिनिधी
विश्व आदिवासी गौरव दिवस उत्साहात साजरा करण्यासाठी भिलिस्थान लायन सेनेची बैठक घेण्यात आली.आदिवासी समाजाची आजची राजकीय, सामाजिक, शैक्षणिक वास्तव्य, बेरोजगारी, स्थलांतर, विकासाच्या योजना व त्याचे खरे वास्तव या विषयांवर चर्चा चर्चा करून विविध उपक्रम राबविण्याचे ठरविण्यात आले.
भिलिस्थान लायन सेनेचे प्रदेशाध्यक्ष पंडीत तडवी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार,दि.२१ जुलै रोजी सकाळी ११ वाजता नंदुरबार येथे विभागीय कार्यालयात बैठकीत झाली. या बैठकीत प्रामुख्याने विश्व आदिवासी गौरव दिनानिमित्त विविध विषयांवर विचार विनिमय करुन चर्चा करण्यात आली.
आदिवासी समाजाची आजची राजकीय, सामाजिक, शैक्षणिक वास्तव्य, बेरोजगारी, स्थलांतर, आदिवासी विकासाच्या योजना व त्याचे खरे वास्तव आदी संवेदनशिल विषयावर चर्चा होवुन अनेक निर्णय सर्वानुमते मंजुर करण्यात आले.
९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस निमित्त राज्यभर आरोग्य शिबिर राबविणे,
व्यसनमुक्ती कार्यक्रमाचे आयोजन करणे, बेरोजगार मार्गदर्शन केंद्र उभारणे, विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया मजबुत व्हावा म्हणून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शैक्षणिक साहित्याचे वाटप करणे या कार्यक्रमांचा समावेश असणार आहे. कार्यक्रम यशस्वितेसाठी पदाधिकार्यांच्या कमिट्या गठीत करण्यात आल्या आहेत.
बैठकीस प्रदेशाध्यक्ष पंडीत तडवी, प्रदेश कार्याध्यक्ष सुभाष भारतीय किसान सेनेचे जिल्हाध्यक्ष उदयसिंग पाडवी,भिलीस्थान लायन सेनेचे जिल्हाध्यक्ष अंकित वळवी,विमुक्त भटके सेल जिल्हाध्यक्ष कांतीलाल जाधव, तालुकाध्यक्ष बिंदास गावित, महासचिव आधार ठाकरे,सुधाकर वसावे, जगन वसावे, मिठू राठोड, सावन पवार, श्रीराम ठाकरे,अर्जुन पवार,रविदास वळवी,राजेश वळवी,भास्कर तडवी आदि उपस्थित होते.








