Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार नगरपरिषदेच्या प्रभागातील विकास कामांसाठी पाच कोटींचा निधी मंजूर, आ.डॉ.विजयकुमार गावित यांच्या पाठपुराव्याला यश

team by team
July 21, 2022
in राजकीय
0
नंदुरबार नगरपरिषदेच्या प्रभागातील विकास कामांसाठी पाच कोटींचा निधी मंजूर, आ.डॉ.विजयकुमार गावित यांच्या पाठपुराव्याला यश

नंदुरबार l प्रतिनिधी
राज्य शासनाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिक्षेत्रात नागरी सेवा व सुविधांची कामे करण्याकरीता नंदुरबार नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 14 व 18 या दोन प्रभागांमधील विविध विकास कामांसाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. सदर निधी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी विशेष प्राधान्य देवुन मंजूर केला असून यासाठी माजी मंत्री तथा विद्यमान आ.डॉ.विजयकुमार गावित यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.

महाविकास आघाडीच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात नंदुरबार शहराचा सर्वांगीण विकास थांबला होता. मात्र आता राज्यात सत्तांतर झाल्याने महाविकास आघाडीचे सरकार जाऊन भाजप-शिवसेना युतीचे सरकार आले आहे.

मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडवणीस यांनी शपथ घेतल्यानंतर कार्यभार सांभाळला असून राज्यातील नगरपरिषद क्षेत्रातील विकास कामांसाठी निधी मंजूर करून आर्थिक सहाय्य केले आहे. गेल्या अडीच वर्षापासून राज्यात थांबलेला विकास कामांना आता सुरुवात होणार आहे.

नंदुरबार नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 14 व 18 या दोन प्रभागात रस्त्यांसह विविध विकास कामे केली जाणार आहेत. या कामांकरीता निधी मिळवुन देण्यासाठी आ.डॉ.विजयकुमार गावित यांनी वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा केला. परंतु मागील अडीच वर्षात महाविकास आघाडीच्या राज्य शासनाने निधी उपलब्ध करून दिला नव्हता.

राज्यात सत्तांतर झाले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आ.डॉ.विजयकुमार गावित यांच्या मागणीची दखल घेवुन नंदुरबार नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक 14 व 18 मधील विकास कामांसाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यामुळे प्रभाग क्रमांक 14 व 18 या दोन्ही प्रभागांमध्ये विविध विकास कामांना चालना मिळणार आहे.

या कामांसाठी निधी मंजूर करुन दिल्याबद्दल आ.डॉ.विजयकुमार गावित यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहे. आ.डॉ.विजयकुमार गावित यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आल्याने नंदुरबार नगरपरिषद प्रभागांच्या कामांसाठी निधी मंजूर झाला आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

शिवसेनेचे डॉ. विक्रांत मोरे २४ जुलै रोजी भाजपात प्रवेश करण्याची शक्यता, हजारो कार्यकर्त्यांसह करणार शक्ती प्रदर्शन ?

Next Post

भिलिस्थान लायन सेनेची बैठक; प्रदेशाध्यक्ष पंडित तडवींचे मार्गदर्शन, आदिवासी दिवस निमित्त आरोग्य, व्यसनमुक्ती शिबिरसह मार्गदर्शन केंद्र उभारण्यावर एकमत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add