नंदुरबार l प्रतिनिधी
येथील लायन्स क्लब व लायन्स फेमिना क्लबचा नूतन कार्यकारिणीचा पद्ग्रहण समारंभ हॉटेल हिरा एकझिक्युटिव्ह मध्ये उत्साहात संपन्न झाला.
या पद्ग्रहण कार्यक्रमासाठी जिल्हयाचे प्रांतपाल जालन्याचे एमजेएफ पुरुषोत्तम जयपुरीया, रिजन चेअरपर्सन जळगावचे एमजेएफ जयेश ललवाणी,झोन चेअरपर्सन हिना रघुवंशी, माजी आमदार शिरीष चौधरी, हिरा उद्योग समूहाचे चेअरमन प्रा.डॉ.रवींद्र चौधरी, भाजप जिल्हाध्यक्ष विजय चौधरी आदीं उपस्थित होते.
.लायन्स प्रथेनुसार मिटिंग कॉल टू ऑर्डर ,ध्वज वंदना,अहवाल वाचन, मावळते अध्यक्ष मनोगत हे कार्यक्रम घेण्यात आले.या नंतर जयेश ललवाणी यांनी दोन्ही क्लब मध्ये नवीन दाखल होणाऱ्या सदस्यांचे परीचय करून त्यांना क्लबचे सदस्यत्व दिले.
प्रांतपाल जयपुरीया यांनी छप्पन्न भोग ही थीम घेऊन अत्यंत आगळ्या वेगळ्या पद्धतीने अध्यक्ष सतीश चौधरी सचिव उद्धव तांबोळी, कोषाध्यक्ष शंकर रंगलानी,फेमिना अध्यक्षा शीतल चौधरी,सचिव मीनल म्हसावदकर, कोषाध्यक्ष अपर्णा पाटील व दोन्ही क्लबच्या नूतन कार्यकरणीचा शपथविधी संपन्न केला.
व पुढील समाजकार्यासाठी मार्गदर्शन केले. सर्व प्रमुख पाहुणे यांनी नूतन कार्यकारणीला शुभेच्छा देत सहकार्याचे आश्वासन दिले. या निमित्ताने रेल्वे स्टेशनवर पाणपोई भूमिपूजन, शैक्षणिक साहित्य व पार्लर किट वाटप व नूतन अध्यक्ष यांचे वडील अशोक चौधरी, व आई मीना चौधरी यांचा सत्कार करण्यात आला. फेरीवाले यांचेसाठी छत्री वाटप हा प्रोजेक्ट् घेण्यात आला.
कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांचा परिचय अश्विन पाटील व राजेंद्र माहेश्वरी यांनी करून दिला. तर ध्वज वंदना डॉ.सी.डी.महाजन यांनी म्हटली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभांगी दाउतखाने व श्रीराम दाउतखाने यांनी केले तर आभार सचिव उध्दव तांबोळी यांनी मानले.
या प्रसंगी समाजातील अनेक प्रतिष्ठीत नागरिक, संस्था प्रतिनिधी व दोन्ही क्लब चे सदस्य सहपरिवार उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व समिति प्रमुख व सर्व लायन्स सदस्यांनी सहकार्य केले.








