नंदूरबार l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील पाडळदा येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की, दि.१२ जुलै २०२२ रोजी १२ वाजेच्या सुमारास शहादा तालुक्यातील पाडळदा येथे एक १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी घरात एकटी असतांना एका नराधमाने घरात घुसुन अत्याचार करीत व जिवे ठार मारण्याची धमकी दिली.
तसेच दि.१४ जुलै २०२२ रोजी ११ वाजेच्या सुमारास मुलगी घरात एकटी असतांना नराधम घरात घुसुन विनयभंग केला व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. मुलगी अल्पवयीन आहे हे माहीत असताना देखील नराधमाने दोन वेळेस तिच्याशी लैंगिक अत्याचार केला म्हणुन संबधीत मुलीने संशयित आरोपिताविरूद्ध स्वतः शहादा पोलीस स्टेशन येथे जावून फिर्याद दिली आहे.
मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार शहादा पोलिस ठाण्यात भादवी कलम 376, 354, 452, 506 लैंगिक अपराध संरक्षण अधिनियम 4, 8, 12 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी संभाजी सावंत व शहादा पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांनी भेट दिली आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरिक्षक माया राजपूत हे करीत आहेत.








