नंदूरबार l प्रतिनिधी
दवाखान्यात आरोग्यावर उपचारांसाठी लाखो रुपये खर्च करण्यापेक्षा रोज नियमित व्यायाम करा व सदैव निरोगी रहा असे प्रतिपादन म्हसावद पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक निवृत्ती पवार यांनी व्यायामशाळेच्या उद्घाटनप्रसंगी उपस्थित नागरिकांना दिला .
म्हसावद येथे एकलव्य फिटनेस क्लब ( व्यायामशाळा ) चे उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पवार बोलत होते . यावेळी क्रीडा शिक्षक सुधाकर पाटील , नितीन महिंद्रे , ज्येष्ठ पत्रकार तथा क्रीडा शिक्षक पुलायन जाधव ,
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हा सरचिटणीस मंजुळा पाडवी उपस्थित होते . मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले . यावेळी प्रास्ताविकात शिक्षक अशोक बागले यांनी फिटनेस क्लब सुरू करण्याचा हेतू स्पष्ट करून व्यायामाचे महत्त्व विशद केले .
अध्यक्ष पोलिस निरीक्षक पवार यांच्या हस्ते फीत कापूनफिटनेस क्लबचे उद्घाटन करण्यात आले . क्लबचे संचालक राहुल पाडवी , केतन पाडवी यांच्या हस्ते मान्यवरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला . क्रीडा शिक्षक सुधाकर पाटील , नितीन महिंद्रे यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी सत्तार ठाकरे , दोंडाईचा येथील रवी जाधव , कुसुमवाडा पोलिस पाटील सुरेखा पराडके , दिलवरसिंग पाडवी , पूनमचंद पाडवी , जयसिंग ठाकरे , मनीषा बेडसे , प्रमिला ठाकरे , सीमा चव्हाण , संगीता पाडवी उपस्थित होते . अशोक बागले यांनी आभार मानले.








