नंदुरबार l प्रतिनिधी
धडगाव तालुक्यातील उमराणी येथील डॉ.सुनिल पावरा यांची दिल्ली येथील नामांकीत मॅक्स हॉस्पीटलमध्ये फेलोशिप इन जॉईंट रिप्लेसमेंट या एक वर्षाच्या कोर्ससाठी निवड झाली आहे.
ते जिल्ह्यातील पहिले जाईंट रिप्लेसमेंट सर्जन होणार आहेत. त्यांच्या या निवडीने येथील पावरा समाजातर्फे सत्कार करण्यात आला.
जॉईंट रिप्लेसमेंटसारखी शस्त्रक्रिया रुग्णांना सुरत, पुणे, नाशिक, मुंबई या सारख्या शहरात जावून करावी लागते. अशी महागडी शस्त्रक्रिया आता नंदुरबार जिल्ह्यातच रुग्णांना उपलब्ध होणार आहे.
त्यांच्या या निवडीबद्दल पावरा समाज मंडळाचे माजी अध्यक्ष प्रा.सरदार पावरा, प्रविण पावरा, प्रकाश पावरा, कांतीलाल पावरा, विजय पावरा, दिलीप पावरा, दानसिंग पावरा, सुभाष पावरा, राकेश मोरे आदींनी डॉ.सुनिल पावरा यांचा सत्कार केला.