नंदूरबार l प्रतिनिधी
घरफोडी व चोरी करणारे 3 संशयित आरोपी यांना 87 हजार रुपये किमतीच्या मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखा व उपनगर पोलीसांची ताब्यात घेतले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मागील काही दिवसांपासुन नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार शहर , उपनगर पोलीस ठाणे हद्दीत घरफोडी व चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याने सामान्य नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते . म्हणून नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी मासिक गुन्हे बैठकीत गुन्ह्यांचा गुन्हे आढावा घेतल. गुन्ह्यातील सक्रीय गुन्हेगारांवर कारवाई करण्याबाबत निर्देश गुन्हे बैठकीत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना दिले .
श्रीमती मिनाक्षी देवराम त्रिभुवन रा . महालक्ष्मी मंदिर शेजारी , देसाईपुरा नंदुरबार हे त्यांच्या आई सोबत सुरत येथे गेले होते . दि. 14 जुलै रोजी पहाटे 5.30 वा . सुमारास श्रीमती त्रिभुवन यांचे गल्लीत राहणारे भगतसिंग राजपुत यांनी श्रीमती त्रिभुवन यांना मोबाईल द्वारे कळविले की , त्यांच्या बंद घराचे लाकडी दरवाज्याचे कडी तोडलेली असून घर उघडी आहे ,
म्हणुन श्रीमती त्रिभुवन दुपारी 2 वाजेच्या सुमारास नंदुरबार येथे घरी पोहचले व घरातील अवस्था पाहुन घरात अज्ञात चोरट्याने चोरी केल्याचे लक्षात आल्याने श्रीमती त्रिभुवन यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे अज्ञात आरोपीतांविरुध्द् भादवि कलम 454,457,380 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता .
तसेच दि . 13 जुलै रोजी रात्री अंबिका भ्र . रविंद्र नाईक हे गुजरजांबोली गावातील त्यांच्या राहत्या घराच्या ओटयावर झोपलेले असतांना कोणी तरी अज्ञात आरोपीतांना अंबिका नाईक यांच्या गळ्यातील सोन्याची पोत व टेक्नो कपंनीचा मोबाईल चोरुन नेला म्हणून उपनगर पोलीस ठाण्यात भादंवि कलम 379,34 गुन्हा नोंद करण्यात आला होता .
याबाबत पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की , नंदुरबार शहरातील देसाईपुरा भागात झालेली घरफोडी बागवान गल्लीतील सराईत गुन्हेगार फिरोज शेख याने केलेली आहे व त्याच्यावर यापूर्वी देखील घरफोडी चोरीचे गुन्हे दाखल आहेत . त्याप्रमाणे पोलीस अधीक्षक पी. आर . पाटील यांनी सदरची बातमी स्थानिक गुन्हे शाखेला सांगून स्थानिक गुन्हे शाखेचे तात्काळ एक पथक तयार करुन बातमीची खात्री करून तात्काळ आरोपींना ताब्यात घेवून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले .
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पथक नंदुरबार शहरात माहिती काढत असता नंदुरबार शहरातील जळका बाजार परिसरात संशयीत आरोपी फिरोज शेख हा एका कापडी पिशवीत काहीतरी घेवून येत असतांना दिसला .
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अत्यंत सावधानता बाळगत सापळा रचला , परंतु संशयीत आरोपी फिरोज शेख हा सराईत गुन्हेगार असल्यामुळे आपण पोलीसांच्या सापळ्यात अडकलो असल्याचे लक्षात येताच संशयीत आरोपी फिरोज शेख याने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला परंतु स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने फिरोज ईस्माईल शेख रा . बागवान गल्ली ,
नंदुरबार याला ताब्यात घेतले. फिरोज शेख यास पिशवीत काय आहे बाबत विचारपूस केली असता तो उडवा उडवीची उत्तरे देवु लागला म्हणून त्यास स्थानिक गुन्हे शाखा येथे आणून विश्वासात घेवून विचारपुस केली असता दोन दिवसापूर्वी नंदुरबार शहरातील देसाईपुरा भागात एका लाकडी दरवाज्याचे कडी तोडून घरातून सोने चांदीचे दागिने व घरगुती वापराचे भांडे व मिक्सर चोरी केले बाबत सविस्तर हकिगत सांगीतली .
त्यामुळे चोरी केलेले 20 हजार 900 रुपये किमतीचे सोने चांदीचे दागिने व घरगुती वापराचे भांडे व मिक्सर चोरी कायदेशीर प्रक्रिया करुन जप्त करण्यात आले आहेत . तसेच फिरोज ईस्माईल शेख याला नंदुरबार पुढील तपासकामी नंदुरबार शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे .
तसेच उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील गुजरजांभोली गावात रात्रीच्या वेळेस झालेली चोरी गुजरात राज्यातील निझर तालुक्यातील रायगड गावातील मनेश आणि अमरसिंग यांनी केली असल्याची गोपनीय बातमी पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांना मिळाल्याने सदरची माहिती उपनगर पोलीस ठाण्याचे सहा . पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे यांना कळवून खात्री करुन पुढील कायदेशीर कारवाई करण्याबाबत आदेशीत केले होते .
त्याअनुषंगाने उपनगर पोलीस ठाण्याचे सहा . पोलीस निरीक्षक यांनी उपनगर पोलीस ठाण्याचे एक पथक तयार करुन दोन्ही संशयीत इसमांना ताब्यात घेण्याबाबत रवाना केले . उपनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने निझर तालुक्यातील रायगड गावात जाऊन मनेश आणि अमरसिंग यांची गोपनीय माहिती काढली असता दोन्ही आरोपी मनेश याचे रायगड गावाच्या बाहेर असलेल्या शेतात लपून बसले असल्याची माहिती मिळून आल्याने
उपनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने मध्यरात्री मनेशच्या शेतात सापळा रचला . परंतु कुत्रे भुंकण्याच्या आवाजामुळे शेतातील झोपडीतून दोन इसम पळतांना दिसून आल्याने उपनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने त्यांचा पाठलाग करून मनेश बारक्या वळवी, अमरसिंग हावल्या वळवी दोन्ही रा . रायगड ता . निझर जि . तापी ( गुजरात राज्य ) यांना ताब्यात घेतले. त्यांना गुजरजांभोली येथील चोरीबाबत विचारपूस केली असता त्यांनी चोरी केली असल्याचे सांगितले .
त्यांना गुजरजांभोली येथील चोरीबाबत विचारपुस केली असता त्यांनी रात्रीच्या वेळेस एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत व एक मोबाईल चोरी केल्याचे सांगितल्याने कायदेशीर प्रक्रिया करुन 16 हजार 988 रुपये किमतीची सोन्याची पोत , एक मोबाईल व गुन्ह्यात वापरलेले 25 हजार रुपये किमतीची मोटार सायकल असा एकुण 41 हजार 988 रुपये किमतीचा हस्तगत करण्यात आलेला आहे . ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित आरोपीतांकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे असे पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील यांनी सांगितले .
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पी . आर . पाटील ,पोलीस अधिक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर , सहा . पोलीस निरीक्षक संदीप पाटील , उपनगर पोलीस ठाण्याचे सहा . पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे , स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार राकेश वसावे जितेंद्र तांबोळी , पोलीस नाईक राकेश मोरे , पोलीस कॉन्सटेबल अभय राजपुत , आनंदा मराठे उपनगर पोलीस ठाण्याचे सहा . पोलीस उप निरीक्षक केशव गावीत , पोलीस नाईक नारायण भिल , अंकुश गावीत यांच्या पथकाने केली आहे .