अक्कलकुवा l प्रतिनिधी
न्याय आपल्या दारी या योजनेंतर्गत अक्कलकुवा दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या वतीने फिरते न्यायालय मोबाईल व्हॅनचा शुभारंभ अक्कलकुवा तालुका सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा न्यायाधीश व्ही.पी.शिंदे व सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश गावीत यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आला.
यावेळी अॅड. पी .आर.ठाकरे,अॅड. संग्राम पाडवी, अॅड. आर.टी. वसावे, अॅड. रुपसिंग वसावे,अॅड.गजमल वसावे, अॅड फुलसिंग वळवी,अॅड.दीपक वळवी, अॅड. जे.टी. वळवी,अॅड.जे.टी. तडवी, अॅड.आर.पी.तडवी, अॅड.डी.एफ.पाडवी,अॅड.एस. एच वसावे,अॅड.बलवंत पाडवी,अॅड.डी. डी. पाडवी, उपस्थित होते.
सदर मोबाईल व्हॅनद्वारे अक्कलकुवा तालुक्यात दोन दिवस गावातच तंट्यांचा व प्रकरणाचा न्याय निवाडा करण्यात येणार आहे. यामुळे पैसा व वेळेची बचत होईल. मागील अनेक वर्षांपासून सदर योजना राबविण्यात येत आहे.
या योजनेचा लाभ घ्यावा,व दिनांक 17 जुलै रविवारी मोलगी येथे कायदेविषयक शिबीर आयोजित करण्यात आले आहे व त्या कार्यक्रमात जास्तीत जास्त पक्षकारांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन न्यायाधीश व्ही.पी.शिंदे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अक्कलकुवा न्यायालयाचे सहा. अधिक्षक विनायक पाडवी, लघुलेखक मयूर पाटील, राजेश वळवी, योगेश साळुंखे, संतोष ठाकूर, सचिन फलाने, प्रशांत भालेराव,धिरसिंग वळवी, व न्यायालयाच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.