नंदूरबार l प्रतिनिधी
संजय गांधी निराधार योजनेत दिव्यांगांना दरवर्षी उत्पन्न दाखला द्यावा ही अट रद्द व्हावी अशी मागणीचे निवेदन अपंग जनता सामाजिक संस्थेतर्फे निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांना देण्यात आले.
नंदुरबार येथे यांना अपंग जनता सामाजिक संस्थेचे महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष आनंद पाटील व इतर पदाधिकाऱ्यांनी हे निवेदन दिले.
या निवेदनात म्हटले आहे की, संजय गांधी निराधार योजनेत दिव्यांगांना दरवर्षी उत्पन्न दाखला द्यावा ही अट रद्द व्हावी असे निवेदन देण्यात आले. या निवेदनाची प्रत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जिल्हा अधिकारी यांच्या मार्फत देण्यात आले.
यावेळी अपंग जनता सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष आनंद पाटील नंदुरबार जिल्हाध्यक्ष मंगेश सोनवणे, महिला जिल्हाध्यक्ष संगीताताई भोई प्रकाशा, नंदुरबार तालुका महिला शोभाताई कोळी, तळोदा तालुका अध्यक्ष प्रतीक्षा वसावे, जिल्हा सचिव सचिन जाधव शहादा तालुका अध्यक्ष मोतीलाल वळवी, सामाजिक कार्यकर्ते सुनील मोरे सर्व नंदुरबार जिल्ह्याचे पदाधिकारी उपस्थित होते.