तळोदा l प्रतिनिधी
तळोदा शहरात व तालुक्यातील बुधावल येथे वीज चोरी केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, तळोदा शहरातील सरदार बन्सी कंजर व सत्तार झिपरु पिंजारी यांनी यांनी ४४ हजार ७० रुपये किंमतीची ११० युनिटची वीज चोरी केल्याचे आढळून आले. तसेच
तळोदा तालुक्यातील बुधावल येथील विलास कृष्णा पाडवी व वसंत दोगा पाडवी यांनी प्रत्येकी २ हजार १७० रुपये किंमतीची १०१ युनिटची वीज चोरी केल्याचे आढळून आले. याबाबत महावितरणचे सहाय्यक अभियंता चेतन रामा पाचपांडे व विलास रोहिदास गुरव यांच्या फिर्यादीवरुन अक्कलकुवा पोलिस ठाण्याच चौघांविरुद्ध भारतीय विद्युत अधिनियम कलम १३५ प्रमाणे चार वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.