नंदुरबार l प्रतिनिधी
शिवीगाळ केल्याच्या संशयावरुन एकास लोखंडी रॉडने डोक्यावर मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, नंदुरबार शहरातील देसाईपुरा येथील भावेश विश्वनाथ सोनवणे व त्याचे तीन मित्र एका कोल्ड्रीक्स दुकानाजवळ गप्पा करीत होते. यावेळी गुंजन प्रमोद सोनवणे हा दारुच्या नशेत तिघा मित्राजवळून जात असतांना भावेश सोनवणे याने शिवीगाळ केली असा संशय घेत
गुंजन सोनवणे याने घरातून लोखंडी रॉड आणून भावेश सोनवणे यांच्या डोक्यात मारुन दुखापत केली. याबाबत भावेश सोनवणे यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात गुंजन सोनवणे याच्याविरोधात भादंवि कलम ३२४, ५०४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.सामनसिंग वसावे करीत आहेत.








