नंदुरबार l प्रतिनिधी
येथील जैन सोशल गृप आणि एच.एम.मेमोरियल लॅबोरेटरी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा कारागृह परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

दिवसेंदिवस पर्यावरणाचा समतोल बिघडत असून मोठया प्रमाणावर होत असलेली वृक्षतोड, जंगलांचा नाश या बाबी त्यासाठी कारणीभूत आहेत. काळाची गरज ओळखून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मोठया प्रमाणावर वृक्षारोपण व त्याचे संवर्धन करणे आवश्यक आहे.
या पार्श्वभूमीवर येथील जिल्हा कारागृह परिसरात जिल्हा कारागृह अधिक्षक आर.आर.देशमुख, सिनियर जेलर जी.एस.रणदिवे यांच्या प्रमुख उपस्थिती सुमारे शंभर वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी जैन सोशल गृपच्या अध्यक्षा पिनलबेन शाह, सचिव जयेश बाफणा, एच.एम.मेमोरियल लॅबचे संचालक कैलास मराठे आदी उपस्थित होते.
यावेळी नितेशभाई अग्रवाल यांच्यातर्फे जिल्हा कारागृहासाठी वीस लीटर पाण्याचा दोन पीप भेट देण्यात आले. येथील जैन सोशल गृप आणि एच.एम.मेमोरियल लॅबोरेटरी यांच्यातर्फे विविध सामाजिक उपक्रम राबवून जनजागृती करण्यात येते. यापूर्वीही पिनलबेन यांच्या कडून जिल्हा कारागृहातील महिला कैद्यांसाठी शिलाई मशिनचे वाटप करण्यात आले आहे.








