नंदुरबार l प्रतिनिधी
अक्कलकुवा तालुक्यातील पिंपळखुटा रस्त्यावर दरड हटविण्याच्या कामाला दोन जेसीबीद्वारे सुरुवात करण्यात आली आहे. दरम्यान अतिवृष्टीतमूळे दरड कोसळून रस्ता बंद झाला होता पुढील दोन दिवसात वाहतूक सुरळीत होईल असे तहसीलदार सचिन मस्के यांनी सांगितले.
अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील पिंपळखुटा, गमण, जांगठी, सिंदुरी, मणीबेली रस्त्यावर अतिवृष्टीत दरड कोसळून रस्ता बंद झाला आहे. काल जिल्हा प्रशासनाच्या दौऱ्यानंतर अक्कलकुवा तालुका तहसीलदार सचिन मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली दरड हटविण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.
बांधकाम विभागाचे शाखा अभियंता यांच्यासह तालुका प्रशासनाने दोन जेसीबीद्वारे दरड हटविण्याच्या कामाला सुरुवात केली आहे. पिंपळखुटा हून पुढे एका जेसीबी द्वारे काम सुरू केले आहे तर जागती होऊन अलीकडे एका जेसीबी द्वारे दरड हटविण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.
पिंपळखूटा हून पुढे संपूर्ण अतिदुर्ग डोंगरदर्याचा रस्ता असल्याने रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात दरड कोसळली असून पुढील दोन दिवसात नागरिकांच्या दळणवळणासाठी रस्ता दुरुस्त करण्यात येईल अशी माहिती अक्कलकुवा तहसीलदार सचिन मस्के यांनी दिली आहे. उद्या आणखी एक जेसीबीद्वारे कामाला सुरुवात केली जाणार आहे.
अक्कलकुवा तालुक्यातील दूर्गम भागातील पिंपळखुटा आवलीफाटा, चिखनीपाडा, छापरीउंबर, रोहय्याबारी, कोराई, दराबारी, मोगरीबारी, जांगठी, शेंदुरी, सिपान, मणिबेली या गावांना जोडणाऱ्या रस्त्यावर अतिवृष्टीत दरोड करून दळणवळणाची सोय बंद झाली आहे. अक्कलकुवा, मोलगी येथे बाजारात येण्यासाठी याच रस्त्याचा वापर केला जातो.
विशेष म्हणजे दुर्गम भागातील रस्त्यांच्या बांधकामाचा दर्जा निकृष्ट दर्जाचा असल्यामुळे पहिल्याच पावसात रस्ते खरडून वाहून जातात असा आरोपी येथील नागरिकांनी केला आहे. पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्या नावाने तयार होणारे रस्ते केवळ नावाला आहेत. येथील रस्त्यांची गुणवत्ता तपासली जात नाही. यापुढे प्रशासनाने ही या भागात बांधकाम केल्या जाणाऱ्या रस्त्यांची गुणवत्ता तपासणे तेवढेच गरजेचे आहे.
दरवर्षी पहिल्याच पावसात दरड कोसळून रस्ता बंद होणारा परिसर दुर्गम भाग आहे. या ठिकाणी पावसाळ्यात सर्पदंशचे प्रमाण जास्त आहे. तसेच गरोदर माता व रुग्णांना दवाखान्यापर्यंत पोहोचण्यासाठी दरड कोसळल्याने जिकरीचे ठरत आहे. आधीच रस्ते खराब त्यात अतिवृष्टीमुळे दरड कोसळल्याने नागरिकांचे जनजीवनच विस्कळीत झाले आहे.
काल जिल्हा प्रशासनाच्या दौऱ्यानंतर अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शिक्षण, आरोग्य, रस्ते सुविधा पूर्ववत करण्यासाठी प्रशासन कामाला लागले आहे.