नंदुरबार l प्रतिनिधी
संत निरंकारी मिशन नंदुरबार शाखेच्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त आज दि.13 जुलै 2022 रोजी नंदुरबार तालुक्यातील बह्याणे येथील स्मशानभूमी परिसरात 172 वृक्षांची लागवड करण्यात आली. वननेस वन या उपक्रमातून संत निरंकारी मंडळाने वृक्ष लागवडीसह संवर्धनाचा संदेश दिला आहे.
सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या पावन आशीर्वादाने देशभरात संत निरंकारी मिशनमार्फत वननेस वन अभियान राबविण्यात येत आहे. नंदुरबार तालुक्यातील बह्याणे गावाच्या स्मशानभूमी परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम गुरुपौर्णिमेनिमित्त घेण्यात आला.
संत निरंकारी मिशन नंदुरबार झोन शाखेच्या वतीने स्मशानभूमी परिसरात 172 रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. या वृक्षारोपण कार्यक्रमातून संत निरंकारी बांधवांनी गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून वृक्ष लागवड व संवर्धनाचा संदेश दिला. बह्याणे गावातील संत निरंकारी बांधव व ग्रामस्थांनी लागवड केलेल्या वृक्षांचे संवर्धन करण्याचा संकल्प केला.
यावेळी संत निरंकारी मिशन धुळे झोनल प्रमुख हिरालाल पाटील, बह्याणेचे सरपंच भगवान राजपूत, ग्रामसेवक बी.ए.पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमास संत निरंकारी मंडळ शहाद्याचे मुखी मोहन आहुजा, नंदुरबारचे मुखी पुंडलिक निकुंभे, दोंडाईचाचे निर्मलाबाई पाटील,
सेवादलाचे दोंडाईचा प्रमुख संजय वाघ, नंदुरबारचे सुनिल बागुल, ग्रामस्थ शंकर पाटील, पांडूरंग राजपूत, राजाराम पाटील यांच्यासह ग्रामस्थ व संत निरंकारी बांधव महिला व पुरुष, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.








