Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

विसरवाडी जवळील पूल दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरू, अवजड वाहनांना अद्यापही प्रवेश बंदच

team by team
July 13, 2022
in राष्ट्रीय
0
विसरवाडी जवळील पूल दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरू, अवजड वाहनांना अद्यापही प्रवेश बंदच

नंदुरबार l प्रतिनिधी
राष्ट्रीय महामार्ग विसरवाडी जवळील पूल दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरू असून अवजड वाहनांना अद्यापही प्रवेश बंदच आहे.

राष्ट्रीय महामार्ग नागपूर सुरतवर नवापूर तालुक्यातील विसरवाडी जवळ अतिवृष्टीमुळे सरपंच नदीवरील पर्यायी पूल वाहून गेल्याने महामार्ग बंद झाला आहे. दरम्यान पावसाचा जोर कमी झाल्याने महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या जे. एम. म्हात्रे ठेकेदाराकडून वाहतूक पूर्ववत करण्यासाठी पुलाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

पावसाच्या पुराने व वाहनचालकांनी अडथळा न दिल्यास लवकरात लवकर दुरुस्त करून देऊ अशी माहिती ठेकेदार जे एम म्हात्रे यांनी दिली आहे. जवळच्या खेडेगावातील शेतकरी बांधवांना बाजारपेठेत येण्यासाठी दुचाकी स्वार व लहान गाड्यांना तात्पुरत्या स्वरूपात तयार केलेल्या पुलावरून जाऊ दिले जात आहे. मात्र अपघात होऊ नये यासाठी मालवाहू अवजड वाहनांना प्रवेश बंद केला आहे.

नागपूर सुरत राष्ट्रीय महामार्गाचे नवापूर तालुक्यात चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. विसरवाडी सरपणी नदीवर मोठ्या पुलाचे काम सुरू असल्याने पर्यायी पूल नदी मधून तयार केला होता. परंतु सरपणी नदीला आलेल्या महापुरामुळे कच्चा पूल वाहून गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.

नवापूर विधानसभेचे आमदार शिरीष नाईक यांनीही वाहतूक पूर्ववत व्हावी यासाठी पाहणी करून संबंधित ठेकेदाराला दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार ठेकेदाराकडून दुरुस्तीचे काम सुरू आहे. वाहन चालकांना रस्ता सुरू झाल्याची चुकीची माहिती मिळाल्याने मोठ्या प्रमाणात ट्राफिक जाम झाली आहे.

महामार्ग कधी सुरू होईल याकडे वाहनचालक टक लावून बसले आहे. मात्र पावसाचा जोर कायम राहिल्यास पुरामुळे दुरुस्तीसाठी मोठी अडचण येऊन जास्त कालावधी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

बातमी शेअर करा
Previous Post

शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाशी पाठपुरावा करणार : पुरुषोत्तम काळे

Next Post

डी. आर. हायस्कूल मध्ये गुरुपौर्णिमा उत्सव साजरा

Next Post
डी. आर. हायस्कूल मध्ये गुरुपौर्णिमा उत्सव साजरा

डी. आर. हायस्कूल मध्ये गुरुपौर्णिमा उत्सव साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add