Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाशी पाठपुरावा करणार : पुरुषोत्तम काळे

team by team
July 13, 2022
in शैक्षणिक
0
शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनाशी पाठपुरावा करणार : पुरुषोत्तम काळे

अक्कलकुवा l प्रतिनिधी
जिल्हा शिक्षक परिषदेतर्फे शिक्षक संपर्क अभियानांतर्गत अक्कलकुवा येथील पंचायत समितीच्या दिगंबर पाडवी सभागृहात तालुकास्तरीय संपर्क मेळावा राज्य कोषाध्यक्ष पुरुषोत्तम काळे यांच्या अध्यक्षतेखाली झाला.

अक्कलकुवा तालुक्यातील शिक्षकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी राज्यस्तरीय, विभागस्तरीय व जिल्हास्तरीय कार्यकर्त्यांनी तालुकास्तरावर जाऊन शिक्षक परिषदेच्यावतीने जिल्ह्यात पहिल्यांदाच अशा प्रकारच्या संपर्क मेळाव्याचे आयोजन करण्यात येऊन सामान्य शिक्षकाचे वैयक्तिक व सामूहिक प्रश्न जाणून घेण्याचा उपक्रम होत आहे. या उपक्रमाचे उपस्थित शिक्षकांनी स्वागत केले आहे.

मेळाव्याच्या सुरुवातीला उपस्थित शिक्षकांनी विविध प्रश्न व समस्या मांडल्या. नियमित पदोन्नती, दरमहा जीवन वेतन, ZPFMS च्या अशासकीय कपाती, सातव्या वेतन आयोगाच्या दुसरा व तिसरा हप्ता, वरिष्ठ व निवड श्रेण, ५ टक्के बांधकाम निधी, पदोन्नती नाकारणार्‍या शिक्षकांचे वसुल केलेले वेतन, वैदकीय बिल, जीपीएफ प्रस्ताव, सेवा पुस्तक नोंदी, वेतनश्रेणी पडताळणी शिबिर, गोपनिय अहवाल, अशैक्षणिक कामकाज, अनावश्यक टपाल माहिती, वसतीशाळा शिक्षक वेतन आदी विषयांवर उपस्थित शिक्षकांनी प्रश्न मांडले.

यावर जिल्हाध्यक्ष नितेंद्र चौधरी यांनी उत्तरे देऊन जिल्हास्तरावरील प्रलंबित प्रश्नांबाबत पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.

शिक्षक परिषदेने आजवर केलेल्या कामाची व कार्यपद्धतीची माहिती विभागीय कार्यवाह रामकृष्ण बागल, विभागीय सदस्य आबा बच्छाव, जिल्हा कार्यवाह किरण घरटे, जिल्हा कार्याध्यक्ष धनंजय सूर्यवंशी, जिल्हा उपाध्यक्ष दिनेश पाडवी यांनी आपल्या मनोगतातुन व्यक्त केली. यावेळी जिल्हा नेते देवेंद्र बोरसे, कोषाध्यक्ष शरद घुगे, कार्याध्यक्ष गणेश मोरे, संघटनमंत्री प्रकाश बोरसे, सहकार्यवाह भगवान मोरे, सहससंपर्क प्रमुख संदीप खेडकर, प्रसिद्धीप्रमुख मनोज चौधरी, महिला आघाडी सहकार्यवाह वंदना न्हावडे यांची विशेष उपस्थिती लाभली.

पुरुषोत्तम काळे यांनी राष्ट्रहित, शिक्षणहीत, विद्यार्थीहित, शिक्षकहीत या राष्ट्रीय विचारांनी प्रेरित होऊन शिक्षक परिषद राज्यात २८ जिल्ह्यात व नंदुरबार जिल्ह्यात सक्रियपणे कार्य करत असून परिषदेने जिल्ह्यात राबविलेल्या शिवजयंती, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त रक्तदान शिबिर , जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा, बिरसा मुंडा जयंती सामूहिक संविधान उद्देशिका वाचन व भारत माता पूजन, रावलापाणी सत्याग्रहातील शहीदांना अभिवादन, शिक्षक परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप आदी उपक्रमातून राष्ट्रभक्ती निर्माण करून सामाजिक समरसता निर्माण करण्याचा प्रयत्न असून शिक्षकांचे प्रलंबित प्रश्नाबाबत जिल्हा विभाग व राज्य स्तरावर पाठपुरावा करून सोडविण्याससाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे काळे यांनी सांगितले.

तसेच शिक्षक परिषदेने आजवर राज्य स्तरावर सोडवलेल्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष दिपक सोनवणे यांनी तर सुत्रसंचलन सहकार्यवाह जगदीश धसे यांनी केले.

 

 

आभार प्रदर्शन रुपेश मोरे यांनी मानले. मेळावा यशस्वीतितेसाठी भाऊसाहेब जाधव, दीपक वसावे, जालिंदर वसावे, सचिन बडोले, सुदाम राठोड, रुपेश मोरे, हेमराज माळी, कांतीलाल वसावे, किसन वसावे, जगदीश पाडवी, दिपक कांदे, बालाजी गुरनाळे, रोहिदास पावरा, गणेश नाईक, श्री.धुळे, श्री.शेंडगे, अंजना कलाल यांचे अनमोल सहकार्य लाभले.

बातमी शेअर करा
Previous Post

संत रविदास नोकरदार समाज उन्नती मंडळातर्फे सेवानिवृत्तांसह गुणवंत सत्काराने भारावले

Next Post

विसरवाडी जवळील पूल दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरू, अवजड वाहनांना अद्यापही प्रवेश बंदच

Next Post
विसरवाडी जवळील पूल दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरू, अवजड वाहनांना अद्यापही प्रवेश बंदच

विसरवाडी जवळील पूल दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरू, अवजड वाहनांना अद्यापही प्रवेश बंदच

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add