नंदुरबार l प्रतिनिधी
तापी नदीवरील प्रकाशा आणि सारंगखेडा बॅरेजचे प्रत्येकी तीन दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडून तापी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.
नंदुरबार जिल्ह्यातून वाहणाऱ्या तापी नदीत शहादा तालुक्यातील सारंगखेडा आणि प्रकाशा येथे शेती सिंचनासाठी बांधण्यात आलेल्या बॅरेजेस मध्ये तापी नदीत पाण्याची पातळी वाढल्याने
सारंगखेडा व प्रकाशा दोन्ही बॅरेजेसमधून प्रत्येकी तीन गेट पूर्ण क्षमतेने खुले करून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. तापी नदी काठावरील नागरिकांनी नदीकिनारी जाऊ नये सुरक्षितता बाळगावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.








