नंदूरबार l प्रतिनिधी
तळोदा तालुक्यातील बोरद येथील ३३ वर्षाचा युवकाचा घरात शॉक लागून मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
बोरद ता.तळोदा येथील दिलीप गोविंद जोहरी यांचा मुलगा सचिन उर्फ काळू दिलीप जोहरी (वय ३३) हा रात्री १० वाजता घरात इन्व्हर्टर जवळ पिन लावत असताना अचानक शॉक लागून जोरात बाहेर फेकला गेला.त्यामुळे त्याला मोठी इजा झाली तरी त्याने त्या अवस्थेत लागलीच मोठ्या भावाला याबद्दल सांगितले की,
मला शॉक लागला आहे.तरी मला पुढे डॉक्टरांकडे घेऊन चल. मोठ भाऊ शहादा येथे खाजगी दवाखान्यात घेऊन जात असताना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली. गावकऱ्यांनी संपूर्ण गाव बंद करून एकच गर्दी केली होती.
त्याच्या मनमिळाऊ स्वभावामुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.त्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा ,आई, वडील, दोन भाऊ, दोन बहिणी व तीन काका असा परिवार आहे.








