नंदुरबार l प्रतिनिधी
देहली मध्यम प्रकल्पाच्या धरण व पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने प्रकल्पाच्या पाणी पातळीत 24 तासात वाढ झाली असून सद्यस्थितीत पाणीपातळी 189.60 मीटरची नोंद झाली आहे.
प्रकल्पाची महत्तम पूर पातळी 200.50 मीटर असून हवामान खात्याने दिलेल्या सूचनेनुसार पुढील 72 तासात पाऊस होण्याची शक्यता असल्याने पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी प्रकल्पाच्या सांडव्यातून पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता असल्याने
देहली नदीकाठावरील डाव्यातीरातील रायसिंगपूर, पुर्नवसन आंबाबारी, जुना नांगरमुथा, नवा नांगरमुथा, घोटपाडा, कोराई, खापर तर उजव्या तीरावरील रांझणी, घुनसी, लालपुरा, वल्ली, कोराई तसेच उखळसाग, भोयरा, सोनपाटी, कोयलीविहिर, खटकुवा, पोहरा, गंगापुर,
घंटाणी, वाकाधामन, अंकुशविहीर,कंकाळी या कालव्यावरील गावातील नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
देहली काठावरच्या गावातील नागरिकांनी तापी नदीपात्रामध्ये आपली गुरेढोरे सोडू नये अथवा नदी काठाजवळ जाऊ नये. नदीमधील पाण्याचे पंप सुरक्षित स्थळी हलवावे, असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सुधीर खांदे यांनी कळविले आहे.








