नंदूरबार l प्रतिनिधी
धडगाव तालुक्यातील कुसूमवेरी येथील दुचाकीस्वारास नंदूरबार येथील चावरा हायस्कूलजवळ भरधाव ट्रकने धडक दिल्याने तो जखमी जखमी झाल्याची घटना घडली आहे.याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, धडगाव तालुक्यातील कुसूमवेरी येथील गुलाब सायसिंग पावरा हे दुचाकीने (क्र.एम.एच.३९-५४८०) नंदुरबार शहरातील चावरा हायस्कूलजवळील रस्त्याने जात होते.
यावेळी एका ट्रक चालकाने त्याच्या ताब्यातील ट्रक रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगात चालवून दुचाकीला धडक दिल्याने गुलाब पावरा यांना दुखापत झाली. अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरुन पसार झाला.
याबाबत गुलाब पावरा यांच्या फिर्यादीवरुन उपनगर पोलिस ठाण्यात ट्रक चालकाविरोधात भादंवि कलम २७९, ३३७, ३३८, मोटार वाहन कायदा कलम १८५, १३४/१८७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.येलवे करीत आहेत.








