नंदुरबार l प्रतिनिधी
धडगाव तालुक्यातील बिजरी वाघबारीपाडा येथे आठ हजार रुपये न दिल्याने डोक्यात दगड घालून ५० वर्षीय इसमाला जिवेठार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, धडगाव तालुक्यातील बिजरी वाघबारीपाडा येथील भरत खेमा वळवी यांनी त्यांच्या घराचे बांधकाम रुमा उतऱ्या तडवी यांना दिले होते.
रुमा तडवी याने घराच्या पायाचे बांधकाम केल. मात्र पुढील बांधकाम केले नाही. त्यामुळे भरत वळवी यांनी रुमा तडवी यांचे घेणे असलेले आठ हजार रुपये दिले नाही.
या कारणावरुन रुमा तडवी याने भरत वळवी यांच्या डोक्यावर दगडाने मारुन गंभीर दुखापत करुन जिवेठार केले. याबाबत अनिल भरत वळवी यांच्या फिर्यादीवरुन धडगाव पोलिस ठाण्यात रुमा तडवी याच्याविरोधात भादंवि कलम ३०२, ३२३, ५०४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक राहूल भदाणे करीत आहेत.








