तळोदा l प्रतिनिधी
जल जीवन मिशन अंतर्गत मंजूर नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण भागात अनेक कामे मंजूर करण्यात येत आहेत अशाच मंजूर कामांचे भूमिपूजन आ. राजेश पाडवी यांच्या हस्ते ग्रामपंचायत रोझवे पुर्नवसन व पाडळपुर येथे करण्यात आले.
रोझवे पुनर्वसन येथे ४ बोअरवेल व १ पाण्याची टाकी त्याचप्रमाणे पाडळपुर येथे १ बोअरवेल आणि १ पाण्याची टाकी अशाप्रकारे या कामांचे उद्घाटन आ.राजेश पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले.
या उद्घाटनप्रसंगी शहादा तळोदा विधानसभा प्रभारी नारायण ठाकरे, भाजपा ता.अध्यक्ष प्रकाश वळवी, मा.सभापती यशवंत ठाकरे,जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र पाडवी ,जिल्हा परिषद सदस्य संगीता पवार ,
माजी जिल्हा परिषद सदस्य सतीश वळवी ,भाजपा आदिवासी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष दरबारसिंग पाडवी,अध्यक्ष भाजपा आदिवासी मोर्चा, दारासिंग वसावे ,
स्वीय सहाय्यक विरसिंग पाडवी, विठ्ठल बागले, प्रविण वळवी,प.स.सदस्य विक्रम पाडवी ,अनिल दाज्या पावरा ,सरपंच सरदार पाडवी, उपसरपंच उदेसिंग तडवी,
ग्रा.प.सदस्य दिनेश पावरा, ग्रा.प.सदस्य बालगी वसावे, भरतसिंग पावरा,विजय पावरा, बुसरा वसावे, रेल्या तडवी,कनर पावरा,बाज्या पावरा,अनाज्या वसावे,वजऱ्या वसावे,रमेश पावरा, मुंगल्या पावरा,हारसिंग पावरा,चौधरी तडवी,पंडित पावरा आदी ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते.








