नवापूर l प्रतिनिधी
तालुक्यातील चरणमाळ घाटातील वळणदार रस्ते चढाव यामुळे नेहमीच अपघात होत असतात गेल्या काही वर्ष्यापासून या घाटात अपघाताची मालिकाच सुरु आहे.जिल्हा पोलीस पी.आर.पाटील यांच्या निर्देशानुसार काल बुधवारी सार्वजनिक बांधकाम विभागाने घाटात पाहणी केली.
या चरणमाळ घाटात आठवड्यात दोन-तीन अपघात घडत असतात या घाटातील अपघातात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
अनेक अपघात होवून वाहनांचे सुद्धा मोठे नुकसान होत असते.चरणमाळ घाटातील वळणदार रस्ते चढाव यामुळे नेहमीच अपघात होत असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने योग्य ती उपाययोजना करण्याचे गरजेचे होते.
नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांनी यावर तातडीने उपाययोजना तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते.
त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने घाटात पाहणी केली.यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता नवले,कार्यकारी अभियंता श्रीमती मिनाक्षी पाटील,उपअभियंता उमेश महाले,सहाय्यक अभियंता संजय पाडवी,वनक्षेत्रपाल श्रीमती स्नेहल अवसरमल,
ठेकेदार चुनीलाल पाटील यांनी भेट दिली.घाट दुरुस्ती संदर्भात काय उपाय योजना केली जाईल याची पाहणी करू चर्चा करण्यात आली.सदर घाटातील अपघातग्रस्त भागाची पाहणी करुन उपाय योजना बाबत चर्चा केली.
घाटाचा उताराच्या दिशेने स्पिड ब्रेकर व रमलींग तात्काळ टाकणे बाबत संबधितांना सुचना दिल्या.तसेच घाटामधील वळणाची लांबी व घाटाचे रुंदीकरण घाट कटींग बाबत तात्काळ इस्टीमेट सादर करणे बाबत कार्यकारी अभियंता यांना सुचना दिल्या.
सप्टेबर महिना अखेर पर्यत काम पुर्ण करणे बाबत सुचना देवुन मार्गदर्शन केले. यावेळी वेळी गावातील सरपंच,पोलीस पाटील व इतर नागरीक उपस्थित होते.वनीकरण विभागाने सुद्धा सकारात्मक भूमिका घेतली आहे.
चरणमाळ घाटात लुटमारीचे प्रमाण वाढले होते. नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांनी यावर तातडीने उपाययोजना तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश नवापूरचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांनाही दिले होते. पोलीस निरीक्षक भापकर यांनी चरणमाळ घाट परिसरातील असलेल्या गावांना भेटी दिल्या दररोज रात्रीच्या वेळी या भागात पेट्रोलिंग सुरू केली आहे.








