नंदुरबार | प्रतिनिधी
शहादा तालुक्याती मंदाणे वनक्षेत्रात अवैध प्रवेश करून २ हेक्टर क्षेत्रात झाडे झुडपे साफ करून नांगरटी करतांना आढळल्याने दोघांना अटक करून ५० हजाराच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.याप्रकरणी दोघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना ४ दिवसांची वनकोठडी सुनावली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आज दि.१३ ऑगस्ट रोजी वनक्षेत्र शहादा कडील परीमंडळ मंदाणा नियतक्षेत्र मानमोड्या पश्चिम कक्ष क्र . ६०२ मध्ये रात्री ३ वाजेच्या दरम्यान वनविभागाचे कर्मचारी गस्त घालीत असतांना संशयीत आरोपी बालु रतनसिंग जाधव,सुरसिग डेमचा पावरा दोघे रा.बडवाणी मध्य प्रदेश यांना वनक्षेत्रात अवैध प्रवेश करुन २ हेक्टर क्षेत्रात झाडे झुडपे साफ करून नांगरटी करतांना आढळल्याने वनविभागाच्या पथकाने त्यांना अटक केली व त्यांच्या ताब्यातुन बैलजोडी, नांगर , मोटरसायकल असे सुमारे ५० हजाराचा मुदेमाल ताब्यात घेतले आहे . वनरक्षक रोहिदास पावरा यांनी वन गुन्हा क्र .०५ / २०२१ चा दाखल करून संशयीत आरोपींना शहादा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना ४ दिवसांची वन कोठडी सुनावली आहे. सदर कार्यवाही उपवनसंरक्षक कृष्णा भवर, सहाय्यक वनसंरक्षक धनंजय पवार, वनक्षेत्रपाल सचिन खुणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास वनपाल एस. एस . इंदवे करीत आहे .सदरची कारवाई वनरक्षक रोहिदास पावरा, ईलान गावित, गुलाब वसावे, नंदकुमार थोरात, बादशहा पिंजारी, डी.डी.पाटील, सुभाष मुकडे, अश्विनी चव्हाण, गंगोत्री चव्हाण, वाहन चालक नईम मिर्झा यांच्या पथकाने केली आहे.