नंदुरबार | प्रतिनिधी
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रद्द असलेल्या व राजीनामा दिलेल्या दुकानाच्या ठिकाणी नवीन रास्तभाव (रेशन) दुकान परवाने घेण्यासाठी गावातील इच्छुक असलेल्याकडून विहीत नमुन्यात अर्ज मागविण्यात आले आहेत.
नंदुरबार तालुक्यातील बामडोद, कलमाडी, मांजरे, खोंडामळी, काळंबा, शिरवाडे, ओझर्दे, नवापूर तालुक्यातील देवळीपाडा (धायटे), चिंचपाडा, बेडकीपाडा, बिलदा, खोलघर, पाचंबा,पळसुन, पालीपाडा, बालआमराई, रायपूर, कोकणीपाडा, नवापाडा (धनराट), चिमणीपाडा, जामतलाव, अक्कलकुवा तालुक्यातील वडली, उखल्लीपाडा, खटकुवा, जुना नागरमुठा, तळोदा तालुक्यातील खेडले, नवांगाव,लाखापूर रे., अक्राणी तालुक्यातील वेलखेडी, बिलगांव, कुवरखेत,चोंदवाडे खु,अस्तंभा रे,आचपा,चींचकाठी,भोगवाडे बु आणि शहादा तालुक्यातील कमखेडा,हिंगणी, शिरुड तह, दोंदवाडे, चिखली खु. या गावातील दुकानासाठी अर्ज मागविण्यात आले आहे.
विहित नमुन्यातील अर्ज व प्रस्तावित रास्तभाव दुकान मंजूरीकरीता नियम, अटी व शर्ती इत्यादीसह सविस्तर जाहिरनाम्याची प्रत संबंधित तहसिल कार्यालय, जिल्हा पुरवठा कार्यालय, तसेच www.nandurbar.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे असे जिल्हा पुरवठा अधिकारी नंदुरबार यांनी कळविले आहे.