Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शहादा येथील डी. एन. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालय वार्षिक स्नेह संमेलन पर्व 2022 उत्साहात

team by team
July 3, 2022
in शैक्षणिक
0
शहादा येथील डी. एन. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालय वार्षिक स्नेह संमेलन पर्व 2022 उत्साहात

शहादा l प्रतिनिधी
येथील पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाच्या डी.एन. पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयात दि.1 जुलै रोजी वार्षिक स्नेह संमेलन ‘ पर्व ‘2022 चे आयोजन करण्यात आले.
तांत्रिक शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव मिळावा या अनुषंगाने हा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. यामध्ये सिव्हिल,काॅम्प्यूटर, मेकॅनिकल,इलेक्ट्रिकल, इन्स्ट्रूमेंटेमेशन, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या विविध विद्याशाखांच्या जवळपास 150 पेक्षा जास्त विद्यार्थ्यानी हिरीरीने सहभाग नोंदवला.

यात विद्यार्थ्यानी नृत्य, गाणी, वाद्य, नाटक, मिमिक्री तसेच रॅम्प शो इत्यादी कला प्रकारांचे तसेच भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविले.या कार्यक्रमामुळे तब्बल अडीच वर्षांनंतर महाविद्यालय परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष दीपक पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील,सचिव श्रीमती कमलताई पाटील, संस्थेचे शैक्षणिक समन्वयक प्रा. मकरंद पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. जे. पाटील तसेच अकॅडमिक डीन डॉ. डी.एम. पटेल यांचे मार्गदर्शन लाभले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाच्या सांस्कृतीक मंडळाचे अध्यक्ष प्रा. प्रशांत पाटील, प्रा. मीनाक्षी चौधरी, प्रा. जयश्री पाटील, प्रा. धीरज शुक्ला, प्रा. मिलिंद पाटील, प्रा. उमेश पाटील, प्रा. योगेंद्र पाटील यांनी परिश्रम घेतले. तसेच अल्पोपहाराचे आयोजन प्रा. भरत पाटील व सहकाऱ्यांनी केले होते. तसेच कार्यक्रम पार पाडण्यासाठी विविध समितीच्या सदस्यांनी सहकार्य केले.

बातमी शेअर करा
Previous Post

राज्यस्तरीय एम.टी.एस. परीक्षेत चोखावाला शाळेतील विद्यार्थीनी एलिना शेख नवापूर केंद्रात प्रथम

Next Post

सातपुड्यातील मशरूम व रसायनमुक्त काळ्या तांदळाला अमेरिकेत मागणी

Next Post
सातपुड्यातील मशरूम व रसायनमुक्त काळ्या तांदळाला अमेरिकेत मागणी

सातपुड्यातील मशरूम व रसायनमुक्त काळ्या तांदळाला अमेरिकेत मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार जिल्ह्यात एक खत परवाना  रद्द, ६ निलंबित

नंदुरबार जिल्ह्यात एक खत परवाना रद्द, ६ निलंबित

April 1, 2026
होळ तर्फे रनाळा येथे घरफोडी करून सव्वा लाखाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास

होळ तर्फे रनाळा येथे घरफोडी करून सव्वा लाखाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास

April 1, 2026
भगवान महावीर जन्मकल्याणक निमित्त नंदुरबारमध्ये भव्य रथयात्रा

भगवान महावीर जन्मकल्याणक निमित्त नंदुरबारमध्ये भव्य रथयात्रा

April 1, 2026
नेदरलँड्समध्ये पोस्टडॉक्टोरल अभ्यासासाठी डॉ. ज्ञानेश्वर राऊत यांची निवड

नेदरलँड्समध्ये पोस्टडॉक्टोरल अभ्यासासाठी डॉ. ज्ञानेश्वर राऊत यांची निवड

April 1, 2026
नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

नंदुरबार तालुक्यात गारपीटमुळे ५ गावे बाधित, ३४४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान

April 1, 2026
तीन प्रमुख चौक उजळले; आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते हायमस्ट लाईटचे लोकार्पण

तीन प्रमुख चौक उजळले; आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते हायमस्ट लाईटचे लोकार्पण

April 1, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add