नंदुरबार l प्रतिनिधी
आदिवासी समाजाच्या पारंपारिक नृत्य कला पथकांना प्रोत्साहन देणे, आदिवासी संस्कृतीचे जतन करण्यासाठी 6 जुलै 2022 रोजी छत्रपती शिवाजी नाट्यमंदीर, नंदुरबार येथे आदिवासी नृत्य कला स्पर्धांचे आयेाजन करण्यात आले आहे.
नंदुरबार प्रकल्प कार्यक्षेत्रातंर्गत नंदुरबार, नवापूर व शहादा तालुक्यातील ज्या इच्छुक आदिवासी नृत्य कलापथकांना स्पर्धेमध्ये भाग घ्यावयाचा असेल अशा नृत्य पथक, कलाकार,
वादकांनी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नंदुरबार कार्यालयाकडे 2 जुलै 2022 पर्यंत संपर्क साधुन नाव नोंदणी करावी, असे आवाहन प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी मीनल करनवाल यांनी केले आहे.