नंदुरबार l प्रतिनिधी
जलशक्ती अभियानातंर्गत नंदुरबार जिल्ह्यात सुरु असलेल्या कामांची पाहणी करण्यासाठी केंद्रीय समिती आज जिल्ह्यात दाखल झाली असून या समितीची बैठक आज बिरसा मुंडा सभागृहात संपन्न झाली.
या बैठकीस उपसचिव (वित्त) श्रीमती अजित सागर, जिल्हाधिकारी मनीषा खत्री, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, सहायक जिल्हाधिकारी मीनल करनवाल, डॉ.मैनक घोष, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार, उपवनसंरक्षक कृष्णा भवर, उपजिल्हाधिकारी शाहुराज मोरे, कार्यकारी अभियंता निलिमा मंडपे, जिल्हा जलसंधारण अधिकारी रविंद्र खोंडे, तांत्रिक अधिकारी सुरेश कुमार आदींसह विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
श्रीमती. सागर यांनी यावेळी जिल्ह्यात विविध यंत्रणांमार्फत सुरू असलेल्या कामांचा विभागनिहाय आढावा घेतला.
यावेळी जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी जिल्ह्यात सुरु असलेल्या जलशक्ती अभियानातंर्गत केटीवेअर बंधारे, सीसीटी, विंधन विहिरी, रेन वॉटर हार्वेस्टींग आदींची 182 कामे पुर्ण झाली असून 82 कामे सुरु आहेत.
जिल्ह्यात जलशक्ती अभियानातंर्गत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचीही माहिती यावेळी दिली. तर जलशक्ती अभियानातंर्गत सहभागी असलेल्या यंत्रणांनी आपआपल्या विभागामार्फत करण्यात येत असलेल्या कामांची माहिती बैठकीत दिली. बैठकीस विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
श्रीमती अजित सागर या तीन दिवसांच्या नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर असून त्या वने, कृषी तसेच इतर यंत्रणांमार्फत केलेल्या कामांना भेट देऊन पाहणी करणार आहे.
जलशक्ती केन्द्रास उपसचिवांची भेट
जिल्हा परिषद, नंदुरबार येथील जलशक्ती केन्द्रास श्रीमती अजित सागर यांनी भेट दिली व तेथील केंद्राची माहिती जाणून घेतली. यावेळी त्यांनी जलशक्ती अभियानात महिलांचा सहभाग वाढावा यासाठी पाणी बचतीसाठी जनजागृती मोहिम राबविण्याच्या सूचनाही दिल्यात.








